डान्सबार बंदी कायम राहील; न्यायदेवतेवर आमचा विश्वास : सुमनताई पाटील
By admin | Published: March 2, 2016 09:10 PM2016-03-02T21:10:38+5:302016-03-02T21:10:38+5:30
महाराष्ट्राचे दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी डान्सबार बंदीचा निर्णय होईल अशी अपेक्षा व्यक्त केलीआहे.
Next
style="text-align: justify;">सुमनताई पाटील
सांगली, दि. २ - आर. आर. पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाकडून तात्पुरती परवानगी मिळाली असली, तरी दोन आठवडय़ानंतर अंतिम निकाल लागणार आहे. यावेळी डान्सबार बंदीचा निर्णय होईल, अशी अपेक्षा आहे. एकूणच या प्रकरणात शासनाकडून प्रतिज्ञापत्र दाखल करायला वेळ लागला. योग्य पध्दतीने पुरावे सादर झालेल नाहीत.
डान्सबारबाबत शासनाची नक्की काय भूमिका आहे हे कळायला मार्ग नाही. दोन आठवडय़ांच्या कालावधीत न्यायालयासमोर शक्य तेवढे सर्व पुरावे सादर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.
डान्सबार बंद असतानाचे गुन्हेगारीचे प्रमाण आणि सुरू झाल्यानंतरचे गुन्हेगारीचे प्रमाण यासह न्यायालयीन लढाईसाठी आवश्यक ते सर्व पुरावे न्यायालयात सादर करण्यात येतील. सर्वोच्च न्यायालयाकडून जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जाईल , अशी अपेक्षा आहे.न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे.
सुमनताई पाटील
-आमदार , तासगाव-कवठेमहांकाळ आणि स्वर्गीय आर. आर. पाटील यांच्या पत्नी.