शिवसेना मुखपत्रावर बंदी घाला - भाजपा

By admin | Published: February 15, 2017 09:36 PM2017-02-15T21:36:40+5:302017-02-15T21:36:40+5:30

महानगरपालिका रणसंग्रामाच्या सुरुवातीलाच शिवसेना-भाजपाची युती तुटली, त्यानंतर दोन्ही पक्ष राज्यातील निवडणुकात आमनेसामने आले.

Ban on the Shiv Sena mouthpiece - BJP | शिवसेना मुखपत्रावर बंदी घाला - भाजपा

शिवसेना मुखपत्रावर बंदी घाला - भाजपा

Next

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - महानगरपालिका रणसंग्रामाच्या सुरुवातीलाच शिवसेना-भाजपाची युती तुटली, त्यानंतर दोन्ही पक्ष राज्यातील निवडणुकात आमनेसामने आले. प्रचार करताना दोन्ही पक्षांनी एकमेंकावर आरोप-प्रत्यरोप करत वातावरण गरम केले. दोन्ही पक्षामध्ये आरोप-प्रत्योरापाचा सामाना रंगला असतानाच भाजपाने आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्रावर निवडणुकीच्या काळात बंदी घालण्यात यावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे.

प्रचाराची मुदत संपल्यानंतर वर्तमानपत्रांतील जाहिरातबाजीवर निवडणूक आयोगाने बंदी घातली असताना सामनामध्ये प्रचाराच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन करण्यात आले असून, निवडणूक आयोगाने सामनावर बंदी घालावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

16 फेब्रुवारी, 20 आणि 21 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध होणाऱ्या सामनाच्या अंकावर बंदी घालावी, आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामना, सामनाचे संपादक आणि शिवसेनेवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
राज्यातील १५ जिल्हा परिषदांसाठी १६ फेब्रुवारीला मतदान होत आहे. १४ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता प्रचाराची मुदत संपली आहे. या कालावधीत वर्तमानपत्रांत जाहिरातबाजीवर बंदी घालण्यात आली असताना, सामनाच्या औरंगाबाद आवृत्तीमध्ये अशा प्रकारचा मजकूर प्रसिद्ध झाला असून, सामनाने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी सामनावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी केली आहे.

Web Title: Ban on the Shiv Sena mouthpiece - BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.