मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी वाहतुकीला बंदी

By admin | Published: October 14, 2016 09:59 PM2016-10-14T21:59:44+5:302016-10-14T21:59:44+5:30

चिपळूण येथील मोर्चासाठी दि. १५ रोजी रात्री १० वाजल्यापासून १६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यत मुंबई-गोवा महामार्ग तसेच कराड-चिपळूण राज्य मार्गावरील जड

Ban on traffic on the Bombay-Goa highway Sunday | मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी वाहतुकीला बंदी

मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी वाहतुकीला बंदी

Next

ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 14 -  चिपळूण येथील मोर्चासाठी दि. १५ रोजी रात्री १० वाजल्यापासून १६ रोजी सायंकाळी ७ वाजेपर्यत मुंबई-गोवा महामार्ग तसेच कराड-चिपळूण राज्य मार्गावरील जड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.
महामार्गावरील वाहतूक दि. १६ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत महामार्गावरील वालोपे येथील फरशी तिठा-गुहागर बायपास रोड ते उक्ताड फाटा व पुन्हा उलट याच मार्गे वळविण्यात आली आहे. कराड-चिपळूण-कराड मार्गावरील एस्. टी. बसेस करिता दि. १६ रोजी सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत कराड, कोकरूड, मलकापूर, आंबाघाट, साखरपा, देवरूख, संगमेश्वर, मध्यवर्ती बसस्थानक चिपळूण व पुन्हा उलट याचमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.
शनिवारी रात्री १२ ते रविवारी सायंकाळपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद राहणार आहे. पोलादपूर येथेच वाहतूक अडविण्यात येणार असून, चुकून तेथून वाहने पुढे आली तरी ती लोटे औद्योगिक वसाहतीत उभी करुन ठेवण्यात येतील. गोवा, सिंधुदुर्गकडून येणारी वाहतूक राजापूर येथूनच वळविण्यात आली आहे. त्यामुळे त्या भागातूनही या मार्गावर वाहतूक होणार नाही.

Web Title: Ban on traffic on the Bombay-Goa highway Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.