वायुगळतीवर मलमपट्टी!

By Admin | Published: July 21, 2016 05:07 AM2016-07-21T05:07:57+5:302016-07-21T05:07:57+5:30

राजूरजवळ टँकरमधून होत असलेली विषारी वायु गळती पूर्णपणे बंद करण्यात ४० तासानंतरही प्रशासनाला यश आलेले नाही.

Bandage bandage! | वायुगळतीवर मलमपट्टी!

वायुगळतीवर मलमपट्टी!

googlenewsNext


राजूर (जि.जालना) : भोकरदन तालुक्यातील राजूरजवळ टँकरमधून होत असलेली विषारी वायु गळती पूर्णपणे बंद करण्यात ४० तासानंतरही प्रशासनाला यश आलेले नाही. बुधवारी दुपारी विषारी वायुच्या टँकरचा समोरचा भाग खड्डयात उतरवून तात्पुरती गळती थांबवण्यात आली होती.
घटनेनंतर फरार झालेला टँकरचालक निमेश मलिया डावर (रा. बडोदा) यास हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. अद्यापही टँकर जागेवरच उभे असल्याने ग्रामस्थांवर भीतीचे सावट कायम आहे. सोमवारी रात्री ‘क्लोरो सल्फोनिक’ नावाचा विषारी वायू घेऊन जाणाऱ्या टँकरला अचानक गळती लागली होती. मंगळवारी दिवसभर प्रशासनातील अधिकारी तळ ठोकून होते, मात्र त्यांना वायुगळती रोखण्यात यश आले नाही. प्रशासनाने दुसरा टँकर बोलावून वायूचा टँकर रिकामा करण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यातही यश आले नाही. मंगळवारी रात्रभर वायू गळती सुरूच होती. हा घातपाताचा प्रकार असावा, असा संशय आल्याने राज्य गुप्तवार्ता विभागाचे पोलीस निरीक्षक शेख यांच्या पथकाने बुधवारी दुपारी पाहणी केली. (प्रतिनिधी)
>शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’
वायू गळतीमुळे पिकांचे नुकसान झाल्याने राजूर बाजारपेठ बंद ठेवून शेतकऱ्यांनी तीन तास रास्तारोको आंदोलन केले. पिकांचा पंचनामा करून मदत देण्याचे लेखी आश्वासन उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.

Web Title: Bandage bandage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.