बंगळुरूमधील सॉफ्टवेअर इंजिनीअरची मुंबईत आत्महत्या
By admin | Published: October 28, 2016 04:15 AM2016-10-28T04:15:34+5:302016-10-28T04:15:34+5:30
एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली
मुंबई : एकतर्फी प्रेम करणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने तरुणीने नकार दिल्याने आलेल्या नैराश्यातून गळफास लावून आत्महत्या केली. मालवणीत मंगळवारी ही घटना घडली. बी. राहुल(२६)असे त्याचे नाव असून, तो मूळचा बंगळुरूचा आहे. काही दिवसांपूर्वी मामाच्या घरी आला होता. सोमवारी या तरुणीचा साखरपुडा झाल्याने त्याने हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.
राहुल हा बंगळूरमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत होता. त्याच्यासोबत काम करणाऱ्या तरुणीवर त्याचे एकतर्फी प्रेम होते. तिने मात्र त्याला स्पष्ट नकार दिल्याने तो निराश होता. वैफल्यग्रस्त झाल्याने तो काही दिवसांपूर्वी मालवणी येथे मामाच्या घरी आला होता. त्याचे मामा अरब अमिरात येथे नोकरीला असून, मामी एकटीच घरी राहाते. मंगळवारी रात्री त्याने बेडरूममध्ये फॅनला दोरी अडकवून गळफास लावून घेतला. थोड्या वेळानंतर मामीच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर, तिने शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना बोलविले. याबाबत मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)