अनुदानित सिलिंडरसाठी बँक खाते क्रमांक आवश्यक

By admin | Published: January 1, 2015 01:27 AM2015-01-01T01:27:04+5:302015-01-01T01:27:04+5:30

अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची सक्ती नसली तरी बँकखाते क्रमांक ग्राहकांना गॅस वितरकांना द्यावा लागणार आहे.

Bank account number is required for subsidized cylinders | अनुदानित सिलिंडरसाठी बँक खाते क्रमांक आवश्यक

अनुदानित सिलिंडरसाठी बँक खाते क्रमांक आवश्यक

Next

जोडणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदत : प्रसिद्धीची जबाबदारी गॅस कंपन्यांवर
नागपूर : अनुदानित सिलिंडरसाठी आधार कार्डची सक्ती नसली तरी बँकखाते क्रमांक ग्राहकांना गॅस वितरकांना द्यावा लागणार आहे.
केंद्र सरकारने जुन्या योजनेत सुधारणा करून मॉडिफाईड बेनिफिट फॉर एलपीजी (एमडीबीटीएल) योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना अनुदानित दरात गॅस सिलिंडर मिळणार आहे. याआधी यासाठी बँक खाते क्रमांकासह आधार क्रमांक देणे बंधनकारक होते. मात्र अनेक ग्राहकांकडे कार्ड नसल्याने या योजनेला विरोध झाला होता. त्यामुळे १७ जून २०१४ ला या योजनेला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर केंद्रात आलेल्या नवीन सरकारने जुन्या योजनेत थोडा बदल केला. त्यानुसार ग्राहकांना संबंधित एजन्सीकडे आपला बँक खाते क्रमांक द्यावा लागणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी नरेश वंजारी यांनी सांगितले की, आधार कार्ड नसेल तर तीन महिने त्यासाठी वेळ दिला जाईल. या योजनेला व्यापक प्रसिद्धी देण्याची जबाबदारी ही गॅस कंपन्यांची असून याबाबत त्यांना सूचना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
५६८ रुपये अ‍ॅडव्हांसमध्ये मिळणार
एचपी गॅसचे विभागीय व्यवस्थापक अमिताब धर यांनी सांगितले की, लिंक केलेल्या खातेधारक ग्राहकाला त्याच्या खात्यात अ‍ॅडव्हान्स स्वरूपात ५६८ रुपये जमा होणार आहे. ग्राहक जेव्हा जेव्हा सिलिंडरची नोंदणी करेल, तेव्हा त्याच्या खात्यात सबसिडीचे रुपये ट्रान्सफर होईल.
समजा ग्राहकाचा मृत्यू झाल्यास...
ग्राहकांचा मृत्यू झाल्यास गॅस कनेक्शन मृताचा मुलगा अथवा पत्नीच्या नावाने ट्रान्सफर करता येते. यासाठी आवेदनकर्त्याला १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र आणि ग्राहकाच्या मृत्यूचे प्रमाणपत्र फॉर्मसोबत गॅस एजन्सीमध्ये जमा करावे लागेल.
असे करावे लिंक
सर्वसामान्यांमधील संभ्रम दूर करण्यासाठी लोकमतने लिंक करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रकाश टाकला आहे.
जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर त्याआधारे तुम्ही लिंक करू शकता. त्यासाठी फॉर्म क्रमांक-१ भरावा लागेल. तो फॉर्म बँकेत अथवा गॅस एजन्सीमध्ये जमा करावा लागतो.
आधारला एलपीजी ग्राहक संख्येशी लिंक करण्यासाठी फॉर्म क्रमांक-२ भरून गॅस एजन्सीकडे जमा करावा लागेल. या फॉर्मची प्रक्रिया आॅनलाईनद्वारे पूर्ण करता येते.
हेल्पलाईनद्वारे लिंक करता येतो.
५७३३३ आणि ५२७२५ वर एसएमएसच्या माध्यमातून लिंक करता येईल.
आधार कार्ड नसेल तर ..
फॉर्म नं. ३ मध्ये १७ अंकीय ग्राहक संख्या भरून आपल्या बँकेत जमा करू शकता.
फॉर्म नं. ४ मध्ये बँक खात्याची माहिती भरून गॅस एजन्सीमध्ये जमा करता येते.
फॉर्म नं. ४ च्या प्रक्रियेला आॅनलाईन पूर्ण करता येते.
(सर्व फॉर्म गॅस एजन्सीचे कार्यालय अथवा सरकारी बेवसाईटवरून आॅनलाईन डाऊनलोड करता येतात.)

Web Title: Bank account number is required for subsidized cylinders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.