राज्यातील तब्बल १० लाख शेतकºयांची बँक खाती बनावट -  चंद्रकांत पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 04:23 AM2017-09-12T04:23:11+5:302017-09-12T04:23:46+5:30

कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतक-यांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.

Bank accounts of 10 lakh farmers in the state are fabricated - Chandrakant Patil | राज्यातील तब्बल १० लाख शेतकºयांची बँक खाती बनावट -  चंद्रकांत पाटील  

राज्यातील तब्बल १० लाख शेतकºयांची बँक खाती बनावट -  चंद्रकांत पाटील  

Next

कोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतक-यांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.
पत्रकारांशी संवाद साधताना पाटील म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतक-यांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत ७२ लाख अर्ज आॅनलाईन दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत. ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतक-यांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार आहे. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतक-यांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जातील.
कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसरा मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का, यावर ‘सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नाही’ असे त्यांनी सांगितले.

‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणार
देवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार आहे. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Web Title: Bank accounts of 10 lakh farmers in the state are fabricated - Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.