बबनराव पाचपुते यांच्या कारखान्यावर बँकेचा ताबा
By Admin | Published: March 30, 2016 01:06 AM2016-03-30T01:06:56+5:302016-03-30T01:06:56+5:30
माजी मंत्री व भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा या खासगी साखर कारखान्यासह अन्य मालमत्तांचा मंगळवारी पंजाब नॅशनल बँकेने प्रतीकात्मक ताबा घेतला. नोटीस देऊनही पाचपुते
अहमदनगर : माजी मंत्री व भाजपाचे नेते बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा या खासगी साखर कारखान्यासह अन्य मालमत्तांचा मंगळवारी पंजाब नॅशनल बँकेने प्रतीकात्मक ताबा घेतला. नोटीस देऊनही पाचपुते यांनी कारखान्यावरील २८७ कोटी ६० लाख रुपयांच्या कर्जाची थकबाकी न भरल्याने बँकेच्या पुण्यातील कल्याणीनगर शाखेने अखेर कर्जवसुली कायद्याखाली ही कारवाई केली.
कर्जापोटी कारखान्याची इमारत, यंत्रणा व अन्य मालमत्ता तारण ठेवली होती. बँकेने डिसेंबर २०१५ मध्ये कारखान्याला ६० दिवसांत थकबाकी भरण्याची नोटीस दिली होती. मात्र, ही थकबाकी भरली गेली नाही.
त्यामुळे बँकेने हिरडगाव
(ता. श्रीगोंदा) येथील कारखान्याची इमारत, यंत्रणा आणि अन्य मालमत्ता, देवदैठण येथील कंपनीची मालमत्ता, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील रहिवासी जागा, श्रीगोंद्यातील
पाचपुते यांचा बंगला ताब्यात घेतला आहे. (प्रतिनिधी)