बँक कर्मचारी आज देशव्यापी संपावर; खासगी बँकांचाच आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 08:39 AM2018-12-26T08:39:04+5:302018-12-26T10:44:20+5:30
सरकारी बँकांच्या अधिकारी संघाने मागील शुक्रवारी संप पुकारला होता.
नवी दिल्ली : सरकारी बँकांच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी संप पुकारल्यामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाविरोधात संप पुकारला आहे. शिवाय वेतन कराराला होत असलेला विलंबही यामागे आहे. एका आठवड्यातील कमी कालावधीतील हा दुसरा संप आहे.
सरकारी बँकांच्या अधिकारी संघाने मागील शुक्रवारी संप पुकारला होता. विलिनीकरण आणि वेतन कराराबाबत लवकर निर्णय घेण्यासाठी त्यांनी संप केला होता. आज पुन्हा संघटनांनी संप पुकारला असून खासगी बँकांची सेवा सुरळीत सुरु राहणार आहे.
Tamil Nadu: Visuals of bank strike from Coimbatore. Nine bank associations are protesting against the proposed merger of Vijaya Bank and Dena Bank with Bank of Baroda pic.twitter.com/nqCvQXrGcU
— ANI (@ANI) December 26, 2018
बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संघटनांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने संप पुकारला आहे. जवळपास 10 लाख कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संघटना या संपामध्ये सहभागी झाल्या आहेत.
केंद्र सरकारने सप्टेंबरमध्ये विजया बँक आणि देना बँकेचे बँक ऑफ बडोदामध्ये विलिनीकरण करण्यास मंजुरी दिली होती.