बॅंक ऑफ इंडियाने डिजिटलायझेशनसाठी 89 गावांना घेतले दत्तक
By Admin | Published: April 26, 2017 05:12 PM2017-04-26T17:12:55+5:302017-04-26T17:12:55+5:30
बॅक ऑफ इंडियाने डिजिटलायझेशनसाठी राज्यातील गावांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बॅंक ऑफ इंडियाच्या 49 शाखा असलेल्या क्षेत्रातील 89 गावांचा समावेश आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 26 - बॅक ऑफ इंडियाने डिजिटलायझेशनसाठी राज्यातील गावांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बॅंक ऑफ इंडियाच्या 49 शाखा असलेल्या क्षेत्रातील 89 गावांचा समावेश आहे.
बॅंक ऑफ इंडियाने यासंदर्भात एक निवेदन जारी केली असून दत्तक घेण्यात आलेल्या गावांमध्ये 227 POS (पॉईन्ट ऑफ सेल) मशिन बसविण्यात येणार आहेत. सप्टेंबर 2017 पर्यंत 57 झोनमधील कमीत कमी पाच गावे डिजिटल करण्याचे लक्ष्य आहे.
बॅंक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ मेलविन रिगो यांनी सांगितले की, आमच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना ग्राहकांना वेगवेगळ्या कार्डबद्दल माहिती देण्यास आणि त्यांचा व्यवहारात उपयोग करण्यास सांगितले आहे. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यास सोयीस्कर होईल आणि सर्व व्यवहार कॅशलेस होण्यास मदत होईल.
बॅंक ऑफ इंडियाच्या 31 जानेवारी 2017 पर्यंत एकूण 5,100 शाखा आहेत. त्यामधील 2,000 शाखा ग्रामीण भागात आहेत.