बँकेच्या निधीतून २६ जणांनाच कर्जमाफी, नगर जिल्हा अद्याप निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 05:27 AM2017-11-20T05:27:45+5:302017-11-20T05:27:56+5:30

पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २६ शेतक-यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे

Bank lending to 26 employees, waive off the loan | बँकेच्या निधीतून २६ जणांनाच कर्जमाफी, नगर जिल्हा अद्याप निरंक

बँकेच्या निधीतून २६ जणांनाच कर्जमाफी, नगर जिल्हा अद्याप निरंक

googlenewsNext

पुणे : जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २६ शेतक-यांनाच कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तसेच या शेतक-यांच्या बँक खात्यांत जमा
केलेले १८ लाख ५० हजार रुपये, पुणे जिल्हा बँकेने स्वत:च्या निधीतून जमा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे अद्यापही जिल्ह्यातील तब्बल २ लाख ९८ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील तब्बल २ लाख ९८ हजार २२ शेतक-यांनी कर्जमाफीसाठी अर्ज दाखल केले. २६ शेतक-यांच्या बँक खात्यांत कर्जमाफीचे १८ लाख ७२ हजार रुपये जमा करण्यात आले.
>अहमदनगर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या खात्यात शेतकरी कर्जमाफीसाठी ३,३४७ शेतक-यांच्या यादीसोबत १८ कोटी रुपये जमा झाले आहेत. सहकार विभागाने ३,३४७ शेतक-यांच्या यादीतील ९१ नावे वगळली. योजनेच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील शेतक-यांची ग्रीन लिस्ट झळकली आहे, पण बँकेस ही अधिकृत यादीच मिळालेली नाही. लक्ष्मीपूजनाच्या आदल्या दिवशी जिल्ह्यातील २८ जोडप्यांना पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देण्यात आली, पण या २८ जोडप्यांपैकी फक्त तीनच जोडप्यांची नावे संकेतस्थळावरील यादीत झळकली आहेत. आतापर्यंत एकाही लाभार्थीच्या खात्यात रक्कम वर्ग झालेली नाही.

Web Title: Bank lending to 26 employees, waive off the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी