मुंबईतील बँक अधिका:याचा आघाताने स्मृतिभ्रंश
By admin | Published: November 11, 2014 01:33 AM2014-11-11T01:33:23+5:302014-11-11T01:33:23+5:30
येथील क्षुधाशांती केंद्राजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या युवकाची ओळख पटली आह़े
Next
जळगाव : येथील क्षुधाशांती केंद्राजवळ बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या युवकाची ओळख पटली आह़े रवींद्र पांडुरंग मगरे (27, रा़ दत्तनगर वाई, जि. सातारा) असे या युवकाचे नाव असून, तो मुंबईतील कॉर्पोरेशन बँकेच्या फोर्ट शाखेत साहाय्यक व्यवस्थापक आहे.
रवींद्र यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्यामुळे त्यांचा स्मृतिभ्रंश झाला आहे. ते जळगावमध्ये कसे आले. हा अपघात आहे का, याबाबत त्यांना काहीच आठवत नाही़ पोलिसांना रवींद्र हे शनिवारी सायंकाळी बेशुद्धावस्थेत आढळून आले होत़े रविवारी रवींद्र यांना शुद्ध आली. त्या वेळी ते जिल्हा रुग्णालयातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत होत़े
सामाजिक कार्यकर्ते प्रमोद
झंवर यांनी रवींद्र यांना रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरून त्यांच्या कक्षात आणल़े रवींद्र यांनी एका
कागदावर मोबाइल क्रमांक लिहून दिला़ त्यावर संपर्क साधला असता
हा क्रमांक त्यांच्या वडिलांचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून
रवींद्र यांची ओळख पटली. (प्रतिनिधी)
कुटुंबीय चिंतित
झंवर यांनी संपर्क साधल्यानंतर रवींद्र यांचे वडील पांडुरंग मगरे सोमवारी जिल्हा रुग्णालयात आले. बँकिंग परीक्षेत रवींद्र देशात दुसरा आला असल्याची माहिती मगरे यांनी दिली. रवींद्र उच्चशिक्षित कुटुंबातील असून, त्यांचे वडील फॉरेस्ट रेंजर, मोठा भाऊ सिव्हिल इंजिनीअर आहे तर त्यांची बहीण नोकरी करत़े