बंकटलालजी कोठारी यांचे निधन
By admin | Published: April 20, 2017 05:57 AM2017-04-20T05:57:20+5:302017-04-20T05:57:20+5:30
आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्ते बंकटलाल मोतीलाल
पुणे : आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष व जैन समाजातील प्रमुख कार्यकर्ते बंकटलाल मोतीलाल कोठारी (८५) यांचे बुधवारी निधन झाले़ कोठारी यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात बंधू शांतिलाल, विजयकांत, शशिकांत व पुत्र राजेंद्र व नितीन कोठारी असा परिवार आहे़
कोठारी हे अनेक सामाजिक संघटनांच्या माध्यमातून समाजकार्यात कार्यरत होते़ आनंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष व दिल्लीच्या आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष तसेच चिंचवडच्या जैन विद्या प्रसारक मंडळाचे ते उपाध्यक्षही होते़ महावीर प्रतिष्ठान व जनसेवा फाऊंडेशनचे सल्लागार व ओसवाल बंधू समाजाचेही ते सभासद होते़ पुण्यात १९८५ मध्ये भरलेल्या जैन साधू संमेलनाचे ते आयोजक होते़ लोकमत मीडिया प्रा. लि. चे चेअरमन आणि सकल जैन समाजाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीर्व शोक व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)