बँकिंग क्षेत्राच्या समस्या सोडवणार- मोईली

By admin | Published: May 14, 2017 04:48 AM2017-05-14T04:48:12+5:302017-05-14T04:48:12+5:30

नोटबंदीनंतर बँक ग्राहकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष देत त्या सोडविण्यात याव्यात या मागणीसह बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्या सोडवाव्यात

Banking will solve the problem: Moily | बँकिंग क्षेत्राच्या समस्या सोडवणार- मोईली

बँकिंग क्षेत्राच्या समस्या सोडवणार- मोईली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नोटबंदीनंतर बँक ग्राहकांना होत असलेल्या समस्यांकडे लक्ष देत त्या सोडविण्यात याव्यात या मागणीसह बँकिंग क्षेत्रातील विविध मागण्या सोडवाव्यात, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी संसदीय अर्थ समितीचे अध्यक्ष वीरप्पा मोईली यांच्याकडे केली. निरुपम यांनी मोईली यांची भेट घेत त्यांच्याकडे विविध समस्यांचा पाढा वाचला.
नोटबंदीनंतर बँकिंग क्षेत्रात मोठे फेरबदल झाले. याचा मोठा फटका ग्राहकांंना बसला. बँकिंग क्षेत्रातील बदलत्या कायद्याचा ग्राहकांना मनस्ताप झाला आहे. या मागण्यांची मोईली यांनी दखल घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. महत्त्वाचे म्हणजे २५ मे रोजी आरबीआय गर्व्हर्नरसोबत होत असलेल्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात येईल, असे आश्वासनही मोईली यांनी निरुपम यांना दिले. शिष्टमंडळात बँक ग्राहक संघटना, एनजीओ आणि बँक युनियनचा समावेश होता.

Web Title: Banking will solve the problem: Moily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.