हॉटेल व्यवसायालाही नोटबंदीचा फटका!
By admin | Published: November 17, 2016 04:26 AM2016-11-17T04:26:47+5:302016-11-17T04:26:47+5:30
नोटांच्या टंचाईचा एका आठवड्यात राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. विशेषत: रोखीने व्यवहार चालणाऱ्या
मुंबई : नोटांच्या टंचाईचा एका आठवड्यात राज्यातील हॉटेल व्यावसायिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. विशेषत: रोखीने व्यवहार चालणाऱ्या १० लाखांपेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरात चलन संकटामुळे व्यवहारच थंडावले आहेत. मुंबईत छोटी हॉटेल व रेस्टॉरंट चालकांचा व्यवसायही मंदावला आहे. बाजारातून अचानक ५०० व हजारच्या नोटा रद्द केल्याने लोक हतबल झाले आहे.
केवळ १०० रुपयांच्या नोटांवर व्यवहार करण्याची वेळ आल्याने पैसे जपून खर्च केले जात आहेत. त्याचा आम्हा हॉटेल व्यावसायिकांना फटका बसल्याचे ‘इंडियन हॉटेल अॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन’चे (आहार) अध्यक्ष अरविंद शेट्टी यांनी
सांगितले.
सध्या ५० टक्के व्यवसाय कमी झाला आहे. मात्र त्याचवेळी कामगार, वीज बील, हॉटेलचे भाडे किंवा कर्जाचा हप्ता तसेच इतर खर्च कमी झालेला नाही. किमान डिसेंबरपर्यंत नोटांच्या संकटाची छाया बाजारावर कायम राहील, तोपर्यंत झळ सोसण्याशिवाय पर्याय दिसत नसल्याचे शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)