बँकांनी नवी धोरणे स्वीकारावी

By admin | Published: June 13, 2016 04:46 AM2016-06-13T04:46:45+5:302016-06-13T04:46:45+5:30

आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत.

Banks accept new policies | बँकांनी नवी धोरणे स्वीकारावी

बँकांनी नवी धोरणे स्वीकारावी

Next


सोलापूर : आर्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना कठीण काळ आहे. सहकारी बँकांना आता नवी धोरणे स्वीकारावी लागणार आहेत. बँकांच्या कर्ज प्रक्रियेत सुलभता आली पाहिजे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
सोलापूर जनता सहकारी बँकेचा सुवर्णमहोत्सव सांगता समारंभ शनिवारी हुतात्मा स्मृती मंदिरात पार पडला. या प्रसंगी नितीन गडकरी बोलत होते. अध्यक्षस्थानी विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे होते. सहकारी बँकांनी ग्रामीण भागात कर्जपुरवठा केला तरच गरिबांचा विकास होऊ शकतो व ओघाने देशाचा विकास होणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. एकूणच भविष्यात सहकारी बँकांना नवीन तंत्रप्रणालीचा अवलंब करावा लागेल. ई-गव्हर्नर यंत्रणा सक्षम करण्याची खूप मोठी जबाबदारी सहकारी बँकांमधील संचालक मंडळांना पार पाडावी लागणार असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
ग्रामीण भागात कर्जपुरवठा करावा
शहरात येणारा सर्वात मोठा ग्राहक हा ग्रामीण भागातला आहे. तोच खचला आणि त्याचा व्यवसाय बंद झाला तर शहरातील सर्वच व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतो. यासाठी नागरी बँकांनी ग्रामीण भागात अधिक कर्जपुरवठा करावा, अशी आग्रहाची सूचना हरिभाऊ बागडे यांनी केली़

Web Title: Banks accept new policies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.