सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 07:45 PM2020-12-21T19:45:22+5:302020-12-21T19:46:02+5:30

Bank Closed: महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे.

Banks closed for three days in a row; do Necessary works, transactions early | सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

सलग तीन दिवस बँका बंद; आवश्यक कामे, व्यवहार लवकर उरका

Next

या आठवड्यात सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. यामुळे जर काही आवश्यक काम असेल तर ते लवकर करावे लागणार आहे. 


बँका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात. यावेळी २६ डिसेंबरला चौथा शनिवार येत आहे. तसेच रविवारी आठवड्याची सुटी असणार आहे. शुक्रवारी ख्रिसमस असल्याने सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. यामुळे गुरुवारपर्यंतच बँक किंवा सरकारी कामे असतील तर ती उरकावी लागणार आहेत. 


महत्वाचे म्हणजे ३१ डिसेंबरला आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख आहे. यामुळे जर बँकेकडून काही महत्वाचे कागदपत्र, स्टेटमेंट हवे असल्यास २८ ते ३० डिसेंबर असाच वेळ असणार आहे. यामुळे तेव्हा गर्दी होण्याची किंवा बँकेवर कामाचा ताण असल्याने वेळ लागण्याची शक्यता आहे. बँकेकडून आयकर भरण्यासाठी अकाऊंट स्टेटमेंट, व्याजातून उत्पन्नाचे सर्टिफिकीट, फॉर्म 26एएस सारखे काही कागदपत्र लागतात. 

राज्यात ख्रिसमस काळात आणि कोरोनाच्या नवीन रुपामुळे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सरकारने निर्णय घेतला असला तरीही सावध राहणे आवश्यक आहे. नवीन वर्षाचे स्वागत बाहेर जाऊन करता येणार नाही. तरीही नववर्षाच्या स्वागताची तयारी ्अनेकांकडून करण्यात येणार आहे. यामुळे बँकेतही कामे उरकण्यासाठी लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Banks closed for three days in a row; do Necessary works, transactions early

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.