बँकांनी ‘स्पोर्टस् लोन’द्यावे

By Admin | Published: November 20, 2015 11:42 PM2015-11-20T23:42:00+5:302015-11-21T00:23:38+5:30

चंद्रकांतदादा पाटील : शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांचा सत्कार

Banks should have 'Sports Loan' | बँकांनी ‘स्पोर्टस् लोन’द्यावे

बँकांनी ‘स्पोर्टस् लोन’द्यावे

googlenewsNext

सांगली : अद्ययावत क्रीडा साहित्याअभावी अनेक गुणवंत खेळाडूंना आपली कामगिरी उंचावताना अडथळे येत आहेत. बँका आणि पतसंस्थांनी ‘स्पोर्टस् लोन’साठी आता पुढाकार घ्यावा. त्यासाठी मी स्वत: प्रयत्नशील आहे, असे मत राज्याचे सहकारमंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
तरूण भारत व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या सत्कार समारंभात चंद्रकांतदादा बोलत होते. ते म्हणाले, खेळाडू आर्थिकदृष्ट्या स्थिर झाला तरच तो चांगली कामगिरी करू शकतो. राज्य सरकारने जागतिक पदक विजेत्या खेळाडूंना थेट नोकऱ्या दिल्या आहेत. त्यामुळे खेळातही उत्तम करिअर होऊ शकते, हे आता पालकांना कळाले आहे. कोल्हापूरची नेमबाज तेजस्विनी सावंतला मी वेळोवेळी व्यक्तीश: सहकार्य केले. खेळाडूंच्या मागे समाजाने उभे राहण्याची गरज आहे. बँका व पतसंस्थांनी होम लोन, कार लोन याप्रमाणे खेळाडूंना अत्यंत कमी व्याजदरात ‘स्पोर्टस् लोन’ उपलब्ध करून दिले पाहिजे. मी सहकार खात्याच्या माध्यमातून यामध्ये स्वत: लक्ष घालणार आहे.
यावेळी तलवारबाजी संघटक प्राचार्य एन. एम. भैरट, राष्ट्रीय तलवारबाजी खेळाडू अर्चना लाड, राष्ट्रीय खो-खोपटू युवराज जाधव व राष्ट्रीय सायकलपटू हुसेन कोरबू यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मान्यवरांच्याहस्ते सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. प्राचार्य भैरट यांनी मनोगत व्यक्त केले. उमेश सूर्यवंशी यांनी स्वागत केले. डॉ. सुहास व्हटकर यांनी सूत्रसंचालन केले. महेश पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, माजी आ. दिनकर पाटील, माजी आ. पृथ्वीराज देखमुख, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, शेखर इनामदार, मकरंद देशपांडे, गोपीचंद पडळकर, शिवाजी सगरे, प्रमोद जगताप, विजय साळुंखे, पारिसा नागे, प्रकाश सूर्यवंशी आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)


हुसेन कोरबूला सायकल...
अत्यंत गरिबीतून येऊन शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत पोहोचलेल्या हुसेन कोरबूने पालकमंत्री चंद्रकांतदादांची भेट घेऊन आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. कोणतीही अद्ययावत सायकल नसतानाही हुसेनने सातपेक्षा अधिक राष्ट्रीय सायकल स्पर्धा गाजवल्या आहेत. तो सध्या पुणे-मुंबई या स्पर्धेची तयारीही साध्या सायकलवरच करत आहे. चंद्रकांतदादांना तरूण भारत मंडळाचे उपाध्यक्ष महेश पाटील व पानपट्टी असोसिएशनचे शहराध्यक्ष युसूफ जमादार हे यांनी सांगितले. त्यानंतर चंद्रकांतदादांनी हुसेनला साडेतीन लाख रुपये किमतीची अद्ययावत सायकल देण्याचे कबूल केले.

Web Title: Banks should have 'Sports Loan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.