Maharashtra Politics: “पडळकर, तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही”; 'तो' बॅनर चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 09:55 AM2023-03-30T09:55:30+5:302023-03-30T09:56:30+5:30

पवारांवर केलेल्या टीकेप्रकरणी बॅनरबाजी करत गोपीचंद पडळकर यांचा निषेध करण्यात आला आहे.

banner against bjp leader gopichand padalkar over criticism on ncp sharad pawar | Maharashtra Politics: “पडळकर, तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही”; 'तो' बॅनर चर्चेत

Maharashtra Politics: “पडळकर, तुम्हाला कधीही माफ करू शकणार नाही”; 'तो' बॅनर चर्चेत

googlenewsNext

Maharashtra Politics: भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर घणाघाती टीका करत आहेत. गोपीचंद पडळकरांकडून टीका करताना अनेकदा आक्षेपार्ह विधाने होताना पाहायला मिळतात. अलीकडेच पुन्हा एकदा गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर टीका करताना जीभ घसरली. मात्र, यानंतर आता गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या या टीकेचा बॅनर लावून निषेध करण्यात आला आहे. 

पवार नावाची कीड महाराष्ट्राला लागली आहे. ती मुळापासून काढून टाकावी लागेल, अशी जहरी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिले आहे. अशातच आता एका माजी सैनिकाच्या मुलाने गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे.  माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांचे पूत्र माधव उर्फ नितीन सूर्यकांत यांनी बॅनर लावत तीव्र निषेध नोंदवला आहे. 

काय म्हणलेय बॅनरवर?

पवार म्हणजे महाराष्ट्राला लागलेली कीड? गोपीचंद पडळकरांचा निषेध. माजी सैनिक सूर्यकांत लालाजी पवार यांनी भारतीय सैन्यात देशसेवा केली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात ते सहभागी झाले होते. देशासाठी प्राण हातावर घेऊन लढणारे आम्ही पवार महाराष्ट्राला लागलेली कीड? आमदार गोपीचंद पडळकर आम्ही पवार कुटुंबीय तुम्हाला कधीच माफ करू शकणार नाही, असे बॅनरवर लिहिले आहे. 

दरम्यान, या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. हा गोप्या म्हणजे भट्टीच्या तव्यावर बसलेल्या बाबासारखा आहे.. पवारांचे नुसत नाव जरी ऐकले की गोप्याच्या बुडाला आग लागली म्हणुन समजा... याला जास्त दिवस संन्यासी ठेवणे त्याच्या पक्षाला परवडणार नाही, हा त्याच्या पक्षाला एकदिवस आग लावून त्याच भट्टीवर बुड शेकत आनंद घेईल.., असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: banner against bjp leader gopichand padalkar over criticism on ncp sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.