CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: “प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 09:54 AM2023-04-07T09:54:06+5:302023-04-07T09:55:45+5:30

CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, अयोध्येत बॅनरबाजी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

banner displayed in ayodhya regarding cm eknath shinde visit | CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: “प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर

CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: “प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…”; अयोध्येत झळकले CM एकनाथ शिंदेंचे बॅनर

googlenewsNext

CM Eknath Shinde Group Ayodhya Visit: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि आमदार अयोध्येला जाणार आहेत. हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिंदे गटातील आमदार आणि समर्थक आमदार ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून, सर्व कार्यक्रम ठरल्याचे सांगितले जात आहे. 

“अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ...”; शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा पहिला टीझर जारी

अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या चरणी धनुष्यबाणाची महापूजा केली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातील विविध जिल्हे आणि तालुक्यांमध्ये हा धनुष्य जनतेपर्यंत फिरवला जाईल, अशी योजना शिंदे गटाने आखल्याचे सांगितले जात आहे. एकनाथ शिंदे समर्थित शिवसेनेचे पक्षसंघटन आणि प्रतिमा दृढ करण्याची सुरुवात अयोध्या दौऱ्यापासून केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर अयोध्येत झळकले आहेत. 

प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्येत लावल्या गेलेल्या बॅनरवर, चलो अयोध्या… प्रभू श्रीरामजी का सन्मान, हिंदुत्व का तीर कमान… असा मजकूर लिहिण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू रामाचे फोटो आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे फोटो आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही भला मोठा फोटो आहे. यासह अयोध्येत शिवसेनेचे झेंडेही लावण्यात आले आहेत. संपूर्ण परिसर भगवामय झाल्याचे सांगितले जात आहे. तत्पूर्वी शिंदे गटाच्या अयोध्या दौऱ्याचा एक टीझर जारी करण्यात आला आहे.  अयोध्या में शंखनाद, आ रहे है एकनाथ..., असे सांगत या टीझरमध्ये हिंदुत्व,भगवा अन् रामराज्याची झलक दाखवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या टीझरमध्ये महाराष्ट्रात रामराज्य, महाराष्ट्र एक सुशासित राज्य असल्याचे दर्शवण्यात आले आहे. सामान्य जनता हा एक परिवार आहे, जनतेची सेवा, मानव सेवा सर्वोपरि आहे, असे या टीझरमध्ये सांगण्यात आले आहे. भगव्याला कधीही डावलले जाणार नाही, अशी ग्वाही देत, रग रग में राम, कण कण में… अशा प्रकारे ओळी वापरून हिंदी भाषेतून हा टीझर बनवण्यात आलाय. तर सर्वांत अखेरीस अयोध्या में शंखनाद… आ रहे है एकनाथ अशी टॅगलाइन देण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: banner displayed in ayodhya regarding cm eknath shinde visit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.