भाजपात प्रवेश देणे आहे! भ्रष्टाचाराचा अनुभव असलेल्यांना पसंती; यवतमाळमध्ये बॅनर झळकले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 06:13 PM2019-07-29T18:13:40+5:302019-07-29T18:21:12+5:30

आयारामांच्या धर्तीवर उपरोधिक टीका

banners in yavatmal stating that bjp accepting tainted leaders | भाजपात प्रवेश देणे आहे! भ्रष्टाचाराचा अनुभव असलेल्यांना पसंती; यवतमाळमध्ये बॅनर झळकले

भाजपात प्रवेश देणे आहे! भ्रष्टाचाराचा अनुभव असलेल्यांना पसंती; यवतमाळमध्ये बॅनर झळकले

Next

यवतमाळ : संपूर्ण राज्यातच विविध राजकीय पक्षातील नेते-कार्यकर्त्यांना भाजपा प्रवेश दिला जात आहे. या राजकीय उलथापालथीवर उपरोधिक टीका करणारे फलक यवतमाळातील बसस्थानक चौकात लावण्यात आले. या फलकाचा मथळाच ‘भाजपात प्रवेश देणे सुरू आहे’ असा आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी सुशिक्षित बेरोजगारांसाठी लवकरच मेगा भरती घेतली जाईल, असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची प्रत्यक्ष पूर्तता अद्याप झालेली नाही. उलट भाजपामध्ये रेडीमेड नेते व कार्यकर्ते इतर पक्षातून आयात केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर प्रवेश देणे सुरू असल्याचे फलक यवतमाळात लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. 



‘भाजपात प्रवेश देणे सुरू आहे’ या मथळ्याखाली अटी आणि शर्ती देण्यात आल्या आहेत. 'ईडी व इन्कम टॅक्स नोटीस आलेल्यांना प्राधान्य, भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती, सहकार क्षेत्र बुडवल्याचा अनुभव' अशा तीन प्रमुख अटी बॅनरवर आहेत. याशिवाय तळटीपदेखील देण्यात आली आहे. 'विचारधारेची कुठलीही अट नाही. आमच्याकडील जागा फुल झाल्यास मित्र शाखेत अ‍ॅडजेस्ट करता येईल,' असा उल्लेख बॅनरवर आहे. बसस्थानक चौकात वर्दळीच्या ठिकाणी लावण्यात आलेला बॅनर अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. हा बॅनर नेमका कोणी लावला याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे.

Web Title: banners in yavatmal stating that bjp accepting tainted leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.