बापलेकीने भरदिवसा काढला काटा, नीरा-नृसिंहपूर हादरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 02:32 AM2017-08-11T02:32:49+5:302017-08-11T02:32:55+5:30
बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प्रकारात मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
इंदापूर : बलात्काराचा गुन्हा दाखल असणाºया आरोपीचा, त्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बापाने कोयत्याच्या चार घावांतच मुडदा पाडला. या हत्याप्रकरणात फिर्यादी मुलगीही सहभागी होती. गुरुवारी (दि. १०) दुपारी तीनच्या सुमारास नीरा-नृसिंहपूर गावातील चौकात हा प्रकार घडला. या प्रकारात मृत तरुणाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा गुन्हा केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत.
नीलेश नागनाथ घळके (वय १७, रा. नीरा-नृसिंहपूर, ता. इंदापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. मृत नीलेशची आई सुनीता नागनाथ घळके (रा. नीरा-नृसिंहपूर) हिने इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सविस्तर हकीकत अशी, फिर्यादी सुनीता घळके व आरोपी हे एकमेकांचे नातलग असून शेजारी रहातात. पीडित मुलीने दि. १० एप्रिल २०१७ रोजी नीलेश नागनाथ घळके व श्रीकांत पोपट घळके (रा. गणेशगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) या दोघांविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. यावरून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात श्रीकांत घळके याला अटक करण्यात आली होती. तर, मृत नीलेश अल्पवयीन असल्याने त्याला त्या वेळी पुण्यातील बालन्यायालयात हजर करण्यात आले होते. तेथेच त्याचा जामीन झाला होता. यामुळे बाप-लेक त्याच्यावर चिडून होते. फिर्यादीच्या घरी येऊन ते सतत ‘न्यायालयाने त्याला सोडले असले तरी मी सोडणार नाही,’ अशी धमकी देत होते. घाबरलेल्या घळके कुटुंबीयांनी नीलेश याला इंदापूर येथील होस्टेलवर ठेवले होते. तो घरी येत नव्हता. इंदापुरातच शिक्षण घेत होता.
नीलेशची परीक्षा संपल्याने तो आज दुपारी ३ वाजता घरी आला. हातपाय धुण्यासाठी तो आत गेला होता. आई-वडील घरात बसले होते. एवढ्यात हातात कोयते घेऊन आरोपी व त्याची मुलगी हे दोघे जण घरात घुसले.
नीलेशचे वडील नागनाथ श्यामराव घळके यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने त्यांच्या हातावर व कपाळाच्या डाव्या बाजूला कोयत्याने वार केले. पीडित मुलीने फिर्यादी सुनीता घळके यांच्या छातीवर
वार केला.
क्रूरपणाने केले वार, परिसरात खळबळ
1 काहीतरी अघटित घडते आहे, याची कल्पना येताच नीलेश हा घरालगत असणाºया दुकानाच्या शटरमधून मागच्या बाजूने पळून गावच्या चौकाकडे गेला.
आरोपी त्याच्या पाठलागावरच होते. आई सुनीता व त्याचे वडील त्याच्या पाठोपाठ पळाले. आरोपीने नीलेशला चौकात गाठून कोयत्याने त्याच्यावर वार केले.
2 नीलेशच्या डाव्या व उजव्या हातावर, गालावर व गळ्यावर वार करण्यात आले होते. झालेले घाव एवढे घातक होते, की त्याच्या डाव्या हाताचा पंजा हातावेगळा होऊन बाजूला पडला होता. चारच घावात त्याचा जागीच मृत्यू झाला. नीलेशचा खून करून आरोपी तेथून निघून गेला. पीडित मुलगी मात्र तिथेच थांबली होती.
3 नीलेशची आई घटनास्थळावर आल्यानंतर ‘या वेळी तू वाचली आहेस; पण तुझ्या घरादाराला सोडणार नाही,’
अशी धमकी देऊन ती तेथून निघून गेली. याचा उल्लेखदेखील फिर्यादीत करण्यात आला आहे. भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने नीरा-नृसिंहपूर चौकात खळबळ उडाली.