संघाच्या गणवेशातील बाप्पा
By Admin | Published: September 10, 2016 07:28 PM2016-09-10T19:28:11+5:302016-09-10T19:28:11+5:30
गणेशाची अगाध रुपे असल्याचे गणेशोत्सवात दिसून येते. अशाच या अगाध रुपांमुळे खामगाव येथील सप्तश्रुंगी गणेश मंडळाने बाप्पाला संघ दक्ष केले आहे
>गिरीश राऊत/ऑनलाइन लोकमत
खामगाव, दि. 10 - गणेशाची अगाध रुपे असल्याचे गणेशोत्सवात दिसून येते. अशाच या अगाध रुपांमुळे खामगाव येथील सप्तश्रुंगी गणेश मंडळाने बाप्पाला संघ दक्ष केले आहे. सर्वत्र गणेशोत्सव साजरा होत असून श्री गणेश विविध रुपात भक्तांना दिसून येत आहे. ज्या वेषात व रुपात गणेश दिसून आला तसे रुप गणेशमूर्तीला देण्यात येत आहे. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, संत गजानन महाराज, श्रीकृष्ण, भगवान शंकर अशी नानाविध रुपे गणेशाची दिसून येतात. याच प्रकारातून खामगाव येथील कासलीवाल ले-आऊट भागात असलेल्या सप्तश्रुंगी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी यावर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या भूमिकेतील गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. या गणेश मूर्तीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा गणवेश असलेली खाकी पॅन्ट, पांढरा सदरा, डोक्यावर काळी टोपी परिधान करण्यात आलेली आहे. तसेच भगवा ध्वज हाती देण्यात आला आहे. मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रतीक जोशी, राम भिते, पंकज कारंजकर, दीपक जोशी, रजत तिवारी, संकेत कडवकर आदींच्या संकल्पनेतून ही मूर्ती साकारण्यात आली आहे. ही गणेशमूर्ती परिसरात कौतुकाचा विषय ठरत आहे.