मुंबईवर बाप्पाकृपा!

By admin | Published: September 21, 2015 02:02 AM2015-09-21T02:02:57+5:302015-09-21T02:02:57+5:30

कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची मुंबईवर चांगलीच कृपा होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे.

Bappakrupa on Mumbai! | मुंबईवर बाप्पाकृपा!

मुंबईवर बाप्पाकृपा!

Next

मुंबई : कधी रिमझिम तर कधी मुसळधार कोसळणाऱ्या पावसाची मुंबईवर चांगलीच कृपा होत आहे. गेल्या दोन दिवसांत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे मोडक सागर धरण भरून वाहू लागले आहे. तसेच २२ दिवसांचा पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे मुंबईकरांवर असलेली पाणीकपात ३० टक्क्यांवर जाण्याची शक्यता मावळली आहे. उलटपक्षी पाणीकपातच मागे घेतली जाण्याची चिन्हे आहेत.
महिना-दीड महिना पावसाने ओढ दिल्याने मुंबईवर २० टक्के पाणीकपातीची कुऱ्हाड कोसळली. औद्योगिक क्षेत्रासाठी केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यातही
५० टक्क्यांनी कपात करण्यात आली होती. बाप्पाच्या आगमनासोबत आलेल्या पावसाने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात जोरदार बरसात केली.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी ३ वाजेनंतर मोडक सागर धरण भरून वाहू लागले; तर सायंकाळपर्यंत तानसा धरणात १२७.६६ मीटर, विहारमध्ये ७७.०२ मीटर, तुळशीमध्ये १३९.९ आणि मध्य वैतरणाच्या साठ्यात २८४.२८ मीटर पातळीपर्यंत वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)

संततधारेचा फटका!
मुंबईत रात्रभर कोसळलेल्या संततधारेने शहरासह उपनगरांत काही ठिकाणी पाणी तुंबले. परळमधील हिंदमाता परिसरात सकाळी पाणी तुंबल्याने स्थानिकांना मनस्ताप सहन करावा लागला. मध्य रेल्वेच्या ट्रॅकवर साचलेल्या पाण्यामुळे लोकलही दुपारपर्यंत उशिराने धावत होत्या.

राज्यात पावसाचा जोर ओसरला
उत्तर मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या नैर्ऋत्य मध्य प्रदेश व गुजरातवर असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होऊन ते आता सौराष्ट्र व लगतच्या भागावर निर्माण आहे़ यामुळे राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे़
पुढील दोन दिवस कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आणि मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे़

१ आॅक्टोबरला पाणीसाठ्याची माहिती घेतल्यानंतरच कपातीबाबत निर्णय घेणार असल्याचे पालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय किमान ८ ते १० दिवस संततधार कोसळल्यास पाणीकपात रद्द होण्याची शक्यताही त्या अधिकाऱ्याने व्यक्त केली.

आॅक्टोबरमध्ये निर्णय ?
तलाव आजची पातळी खोली
मोडक सागर १६२.८६१६३.१५
तानसा१२७.५६१२८.६३
विहार७६.९७८०.१२
तुळशी१३९.०२१३९.१७
अपर वैतरणा६००.२८६०३.५१
भातसा१३३.१३१४२.०७
मध्य वैतरणा२८४.३०२८५
(आकडेवारी मीटरमध्ये)

Web Title: Bappakrupa on Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.