बाप्पाच्या मूर्ती महागल्या
By admin | Published: July 25, 2014 12:03 AM2014-07-25T00:03:16+5:302014-07-25T00:03:16+5:30
महागाईची झळ विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही बसत आहे.
Next
महेश बाफना - मुंबई
महागाईची झळ विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या मूर्तीलाही बसत आहे. हा महागाईचा आलेख दरवर्षी वाढतोच आहे. गुजरातहून येणा:या शाडूच्या मातीपासून रंगांर्पयत मूर्ती बनविण्यासाठी आवश्यक असणा:या सर्वच घटकांचे भाव वधारल्याने गणोशमूर्ती महाग झाल्या आहेत. कारखान्यांमध्येच गणोशमूर्तीचे भाव 15 ते 20 टक्के वाढतील. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत त्या आणखी महाग होतील, असे निरीक्षण मूर्तिकार नोंदवितात.
29 ऑगस्टपासून गणोशोत्सव सुरू होत आहे. अजून गणोशाच्या स्वागतासाठी महिना शिल्लक
असला तरी दोनेक महिन्यांआधीपासूनच शहरात ठिकठिकाणी असलेल्या कारखान्यांमध्ये मूर्ती साकारणा:या कारागिरांची लगबग सुरू झालेली आहे. गिरगावच्या झावबावाडीत राहणारे प्रदीप रामकृष्ण मादुस्कर सांगतात, मूर्तीसाठी आवश्यक असलेली माती प्रामुख्याने गुजरातच्या भावनगर, सौराष्ट्र येथून येते.
यंदा मातीचे भाव वधारले आहेत. शिवाय कारागिरांची मजुरी, रंग आणि अन्य साहित्यांसह जागेचे भाडे वाढले आहे. त्यामुळे मूर्तीचे भाव वाढविण्यावाचून पर्याय नाही. मादुस्कर शाडूच्या मातीच्या मूर्ती साकारण्यासाठी प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांची ‘वैभवसंपन्न’ या प्रकारातील विशेष गणोशमूर्ती अनेक दिग्गजांचे आकर्षण ठरते.
मोठय़ा, सार्वजनिक गणोशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेले राजन खातू म्हणतात, गेल्या वर्षीच्या
तुलनेत मूर्तीचे भाव यंदा 2क् टक्क्यांहून अधिक वाढू शकतील. मातीप्रमाणो प्लास्टर ऑफ पॅरिस, काथ्या, लोखंडाचे भाव वाढले आहेत. जर बाराही महिने कायमस्वरूपी जागा मूर्तिकारांना उपलब्ध झाल्यास 5क् टक्के इकोफ्रेंडली गणोशमूर्ती नक्की बनू शकतील. या वर्षी खंडेरायाच्या रूपातल्या गणोशमूर्तीला विशेष मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.