बाप्पांची मॉरिशसवारी

By admin | Published: July 7, 2014 11:41 PM2014-07-07T23:41:36+5:302014-07-07T23:41:36+5:30

गणरायाच्या भक्तीत तल्लीन होणारे भाविक केवळ भारतात नसून परदेशांतही मोठय़ा प्रमाणात आहेत.

Bappa's Mauritius | बाप्पांची मॉरिशसवारी

बाप्पांची मॉरिशसवारी

Next
बदलापूर : गणरायाच्या भक्तीत तल्लीन होणारे भाविक केवळ भारतात नसून परदेशांतही मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळेच गणोशोत्सव साजरा करण्यासाठी परदेशांतील भाविक भारतातून गणोशाच्या मूर्तीची मागणी करीत आहेत. बदलापुरातील गणोश चित्रकला मंदिरातून गेल्या सात वर्षापासून गणोशाच्या मूर्ती मॉरिशसला जात आहेत. यंदाही 488 मूर्ती मॉरिशसला पाठवण्यात आल्या आहेत. 
बदलापूरमध्ये 68 वर्षापूर्वी आंबवणो कुटुंबीयांनी गणोश चित्रकला मंदिराची सुरुवात केली. आता हे काम उल्हास आंबवणो पाहात आहेत. बाराही महिने या कला मंदिरात गणोशाच्या मूर्तीची कलाकृती रेखाटण्यात येते. बदलापुरातील सर्वात जुने केंद्र म्हणून त्यांची ख्याती आहे. गेल्या सात वर्षापासून या केंद्रात तयार झालेल्या मूर्ती मॉरिशसला पाठवण्यात येत आहेत. मॉरिशस टेम्पल फेडरेशन ही संस्था दरवर्षी बदलापूरमधूनच गणपतीच्या मूर्ती मागवत आहे. सात वर्षापूर्वी 2क्क् मूर्ती मॉरिशसला पाठवण्यात आल्या. तेथील मागणी वाढल्याने यंदा 488 गणोशमूर्ती पाठवण्यात आल्या आहेत. बदलापूर ते न्हावा-शेवा बंदर आणि तेथून 3क् दिवसांनी मॉरिशस असा या मूर्तीचा प्रवास राहणार आहे. सर्व गणोशमूर्ती 9 मिमी जाडीच्या कोरोगेटच्या बॉक्समध्ये जाड प्लास्टिक पिशवीत पॅक करून पाठवण्यात आल्या आहेत. दरवर्षी सहा हजार गणोशमूर्ती या कला केंद्रात बनवण्यात येतात. या केंद्रात 3क् कामगार असून यामध्ये 7 महिला तसेच काही अपंग, मुके, बहिरे कारागीरही रात्रंदिवस मूर्ती घडवण्याचे काम करत आहेत. मॉरिशसमध्ये सात देशातील गणोशमूर्तीचे प्रदर्शन भरवले जाणार असून त्या प्रदर्शनात 5 फूट दगडूशेठ हलवाईची गणोशमूर्तीही ठेवली जाणार असल्याचे समीर आंबवणो यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Bappa's Mauritius

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.