बारामतीत बनावट ग्रामपंचायत उघड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 04:08 AM2018-01-06T04:08:33+5:302018-01-06T04:08:50+5:30
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १९८५ ते २०१२ सालापर्यंत म्हणजेच तब्बल २८ वर्षांपासून ‘ग्रामपंचायत बारामती ग्रामीण’ या बनावट नावाने ग्रामपंचायत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई - पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात १९८५ ते २०१२ सालापर्यंत म्हणजेच तब्बल २८ वर्षांपासून ‘ग्रामपंचायत बारामती ग्रामीण’ या बनावट नावाने ग्रामपंचायत कार्यरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या ५ वर्षांपासून या प्रकरणावर शासनाकडून चौकशीचा फार्स सुरू असून, अद्याप या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण उघड करणारे आरटीआय कार्यकर्ते आता उच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहेत.
‘ग्रामपंचायत बारामती ग्रामीण’ या नावाने बनावट लेटर हेड आणि स्टँप तयार करून तब्बल २८ वर्षे शासनाच्या कर्मचा-यांनी सरकारी योजनेचा निधी लाटल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते पोपट धवडे यांनी केला आहे. धवडे यांनी सांगितले की, २०१० साली या प्रकरणाला वाचा फोडली. बारामतीमधील त्रिशंकू भागात ही ग्रामपंचायत अस्तित्त्वात असल्याचे दाखवत, संबंधित अधिकाºयांनी सरकारी निधीचा अपहार केला आहे. दुसरे माहिती अधिकार कार्यकर्ते वसंत घुले म्हणाले की, ग्रामपंचायतीमध्ये २८ वर्षांच्या कालावधीत ग्रामसेवक, विस्तार अधिकारी आणि गटविकास अधिकाºयांच्या नेमणुका झाल्या. सर्व २८ अधिकाºयांवर कार्यकारी अधिकाºयांनी दोषारोपपत्र ठेवले आहे.