अतिक्रमण कारवाईविरोधात बारामतीत मोर्चा
By admin | Published: August 23, 2016 01:24 AM2016-08-23T01:24:37+5:302016-08-23T01:24:37+5:30
अतिक्रमणात हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
बारामती : नगर परिषदेने नुकत्याच केलेल्या अतिक्रमणात हातगाड्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पथारी असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.
असोसिएशनचे संस्थापक, बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात झाली. त्यानंतर एसटी स्टँड, इंदापूर चौक, गुणवडी चौक, मारवाड पेठ, गांधी चौक, सुभाष चौकमार्गे नगर परिषदेसमोर मोर्चा आला. या ठिकाणी निषेधसभा घेऊन मोर्चाची सांगता करण्यात आली. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी निवेदन घेऊन हॉकर्स झोनबाबत माहिती दिली. तसेच, वाहतुकीला अडथळा न आणता व्यवसाय करण्यास हरकत नसल्याचे सांगितले.
बसपाचे शहराध्यक्ष राहुल कांबळे, जिल्हा महासचिव अण्णा थोरात यांच्यासह पदाधिकारी दयानंद पिसाळ, विलास धोत्रे, राहुल साबळे, विजय जगताप, सोमनाथ वीरकर, सुनील चव्हाण, गणेश शेवाळे, साधना मोरे, महंमद बागवान, आसिफ शेख, श्रीनिवास मोरे, अशोक सुद्धालकर, अजित सय्यद, प्रवीण साळुंके, अप्पू मोमीन, गणेश महाले, इम्रान शेख, अमोल थोरात, प्राजक्ता जगताप यांच्यासह हातगाडी, पथारीवाले मोर्चासाठी उपस्थित होते. (प्रतिनिधी)