बारामतीत थंडी तापाचे रुग्ण वाढले

By admin | Published: July 14, 2017 01:39 AM2017-07-14T01:39:25+5:302017-07-14T01:39:25+5:30

बारामती शहरात नागरिकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे

In Baramati, there was increased chances of cold fever | बारामतीत थंडी तापाचे रुग्ण वाढले

बारामतीत थंडी तापाचे रुग्ण वाढले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : बारामती शहरात नागरिकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. बारामती शहरात अद्यापपर्यंत एकही डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ किरकोळ थंडीतापाचे रुग्ण आहेत.
याबाबत बारामती शहरातील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. मीरा चिंचोलीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बारामती शहरात नागरीकांचे आरोग्य, आजार सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे. बारामती शहरात अद्यापपर्यंत एकही डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळलेला नाही. केवळ किरकोळ थंडीतापाचे रुग्ण आहेत. मात्र, या काळात डेंग्यूसदृश आजार, चिकुन गुनिय आजाराचे रुग्ण आढळतात. या पार्श्वभूमीवर आरोग्य प्रशासनाच्या वतीने सर्वेक्षण सुरु करण्यात आले आहे.या वेळी नागरिकांना कोरडा दिवस पाळण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी अनावश्यक ठिकाणी पाणी साठू देऊ नये. साठलेल्या पाण्याची डबकी नष्ट करा. पाणी वाहते करावे. पाणी भरलेली भांडी झाकुन ठेवावी. आठवड्यातुन किमान एक दिवस कोरडा दिवस पाळावा. या दिवशी घरातील सर्व पाणीसाठा रिकामा करावा. नारळाच्या करवंट्या, टायर मध्ये पावसाचे पाणी साठते. यामध्ये डेंग्यूसदृश आजारांना कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होण्याचा धोका असतो. त्यामुळे घराच्या सभोवताली टायर, नारळाच्या करवंट्या साठू देऊ नये. स्वच्छतागृहाच्या वर काढलेल्या पाईपला नायलॉनची जाळी घालावी, असे आवाहन डॉ चिंचोलीकर यांनी केले आहे.
दरम्यान,रुग्णालयाकडे सध्या सर्वेक्षणासाठी केवळ ४ कर्मचारी उपलब्ध आहेत. या उपलब्ध कर्मचाऱ्यांद्वारेच शहरात आरोग्य सर्वेक्षण सुरु आहे. मात्र, आणखी कर्मचारी भरतीबाबत वर्तमानपत्रामध्ये जहिरात प्रसिध्दी करण्यात आली आहे. त्यामुळे येत्या ८ ते १५ दिवसांत आवश्यक कर्मचारी उपलब्ध होतील. त्यानंतर शहरातील सुमारे १ लाख २१ हजार लोकसंख्येचे आरोग्य नियोजन करणे शक्य होईल, असे डॉ. चिंचोलीकर म्हणाल्या.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जगताप यांनी सांगितले की, तालुक्यात केवळ मोरगांवमध्ये डेंग्यूसदृश ताप, चिकुन गुनिया सदृय आजाराची साथ आहे. तरीदेखील तालुक्यात इतर ठिकाणी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना दक्षता घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. डासांमुळे या आजारांची लक्षणे आहेत. त्यामुळे डास आढळणाऱ्या ठिकाणी ग्रामपंचायतींना धुराळणी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईमुळे पाणी साठविण्याची त्या भागात मानसिकता दिसून येते. त्यातून आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. हे टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आवश्यक दक्षता घ्यावी.
मोरगाव : मोरगावसह परिसरात साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. चिकुनगुण्निया, गोचीड ताप, स्वाईन फ्लू ,थंडी, ताप हे साथीचे आजार बळावत चालले आहेत. घरोघरी लोक आजारी असल्याने आरोग्य खात्यामार्फत तत्काळ ठोस उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
>मोरगाव परिसरात साथीच्या रोगाचे थैमान
मोरगाव तरडोली या परीसरात साथीचे रोग मोठया प्रमाणात फोफावत चालले आहेत.मोरगाव येथील खाजगी दवाखान्यात रोज शंभर पेक्षा अधीक रूग्ण आजारी असल्याने तपासणी करण्यासाठी येत आहेत.पैकी ३० पेक्षा अधीक रूग्ण हिवताप, चिकण गुणीया , मलेरीया स्वाईन फ्ल्यू आदी आजाराने त्रस्त आहेत.हे साथीचे आजार बळावत चालले आहेत.नाझरे जलाशयातील मृत पाणीसाठयातुन १६ गावांना सध्या पाणी पुरवठा सुरू आहे.मात्र हे पाणी दुषीत येत असल्याने रूग्णांची संख्या वाढत चालली आहे.
साथीचे रोग बळावत असले तरी आरोग्य खात्याकडुन ही साथ अद्याप आटोक्यात आली नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.या भागात अद्याप पावसाने दडी मारली आहे. दुबार पेरणीचे संकट समोर आहे.या दरम्यान साथीचे रोग आल्याने परीसरात डास निर्मुलन, निर्जंंतुकीकरण करण्याची मागणी होत आहे.
>..घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे
घरो घरी सर्व्हे करण्यात येत आहे. ज्या रूग्णांना ताप आला आहे ,त्यांची माहीती गोळा केली आहे.तसेच डास आळ्या पैदास केंद्र सर्व्हे केला असुन ग्रामपंचायतीला पत्र दिले आहेत.यावर उपाय योजना कण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असे मोरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल वाघमारे यांनी सांगितले.
>ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा : डॉ. वाघमारे
मोरगाव : मोरगाव सह परीसरात हिवताप , चिकण गुणीया मलेरीया ,गोचीड ताप या विविध साथीचे रोग बळावत चालले आहेत. यासाठी ग्रामस्थांनी कोरडा दिवस पाळावा .तसेच डास उत्पत्ती केंद्र नष्ट करावी ,असे आवाहन वैद्यकीय अधीकारी अनील वाघमारे यांनी केले आहे.
दुषीत पाणी व किटकजन्य विषाणु यांमुळे मोरगाव, तरडोली ,आंबी सह परीसरात ग्रामस्थ साथीच्या आजाराने त्रस्त आहेत. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी ग्रामस्थांनी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन मोरगाव आरोग्य खात्याकडून केले जात आहे. नाझरे जलाशयातुन पाणी खंडीत पाणी पुरवठा होत असला तरी कोरडा दिवस पाळल्यानंतर ही साथ बहुतांश आटोक्यात येईल ,असे डॉ वाघमारे यांनी सांगीतले
त्याचबरोबर आपापल्या पारीसरातील डास उत्पत्ती केंद्रे नष्ट करावीत .तसेच परीसरातील ग्रामपंचायंतींनी धुर फवारणी करण्यासाठी पत्र दिले आहेत. हे साथीचे रोग हवा व किटकांमार्फत पसरत असल्याने घरोघरी जाउन आरोग्य केंद्रांचे कर्मचारी ताप आलेल्या रूग्णांचा सर्व्हे करीत आहेत.मात्र, परीसरातील ग्रामस्थांनी यासाठी योग्य सहकार्य करून कोरडा दिवस पाळावा.

Web Title: In Baramati, there was increased chances of cold fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.