‘बारोमास’ला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार

By admin | Published: February 17, 2016 02:25 AM2016-02-17T02:25:55+5:302016-02-17T02:25:55+5:30

दामोदर खडसे यांचा गौरव; हिंदी अनुवादाची राष्ट्रीय पातळीवर दखल.

'Baromas' Sahitya Akademi's translation award | ‘बारोमास’ला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार

‘बारोमास’ला साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार

Next

बुलडाणा : प्रख्यात साहित्यिक डॉ. सदानंद देशमुख यांच्या बारोमास या कादंबरीचा हिंदी अनुवाद प्रख्यात लेखक दामोदर खडसे यांनी केला असून, त्यांना साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. या कादंबरीला २00४मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. शेतकर्‍यांचे शोषण मांडणारी ही कादंबरी प्रादेशिक पातळीवरील असली तरी साहित्य अकादमीमुळे विदर्भातील शेतकर्‍यांची व्यथा सर्वत्र पोहोचली. डॉ. सदानंद देशमुखांच्या या कादंबरीने प्रभावित होऊन दामोदर खडसे यांनी या साहित्याचा हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. या हिंदी अनुवादाला साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाल्याने कादंबरीच्या विषयाला पुन्हा उजाळा मिळणार आहे. या वेगळय़ा धाटणीच्या साहित्याची दखल घेत अनामिका, प्रा. जयप्रकाश आणि प्रा. मोहन यांच्या निवड समितीने बारोमास कादंबरीच्या अनुवादाची पुरस्कारासाठी निवड केली. दामोदर खडसे अकोल्याचे सुपुत्र बारोमास या कांदबरीचा अनुवाद करणारे दामोदर खडसे हे मूळचे अकोल्यातील रहिवासी आहेत. बँकेच्या नोकरीनिमित्ताने ते पुणे येथे स्थायिक झाले आहेत. विदर्भातील हिंदी साहित्य निर्मितीत खडसे यांचे योगदान राहिले असून, त्यांची सुमारे ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यामध्ये ९ कविता संग्रह व ४ मराठी अनुवादीत साहित्याचा समावेश आहे. दया पवार यांचे बलुतं, राम नगरकर यांचं रामनगरी, अरूण खोरे यांची आत्मकथा, छावा, आदी साहित्याचे खडसे यांनी हिंदी भाषेत अनुवाद केला आहे. ह्यकाला सूरजह्ण या पुस्तकासाठी त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

Web Title: 'Baromas' Sahitya Akademi's translation award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.