बांगलादेशीकडे सापडले आधार कार्ड

By admin | Published: March 21, 2016 03:17 AM2016-03-21T03:17:10+5:302016-03-21T03:17:10+5:30

शहरातील नवी वस्ती व शास्त्रीनगर भागात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० बांगलादेशी नागरिक आढळले. त्यापैकी एकाकडे आधार कार्ड व दोघांकडे पॅन कार्ड सापडले आहे

Base card found by Bangladeshi | बांगलादेशीकडे सापडले आधार कार्ड

बांगलादेशीकडे सापडले आधार कार्ड

Next

भिवंडी : शहरातील नवी वस्ती व शास्त्रीनगर भागात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत १० बांगलादेशी नागरिक आढळले. त्यापैकी एकाकडे आधार कार्ड व दोघांकडे पॅन कार्ड सापडले आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे.
नवी वस्ती व शास्त्रीनगर भागातील नजीर मेस्त्री यांच्या इमारतीत व पप्पू टेलर यांच्या पडक्या चाळीत राहणाऱ्या १० बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी शनिवारी रात्री साडेआठ वाजता अटक केली. त्यांची माहिती घेतली असता, पैसे कमावण्याच्या उद्देशाने त्यांनी छुप्या मार्गाने भारतात प्रवेश केला आणि कोलकाता येथून रेल्वे प्रवास करत, कल्याण येथे उतरून भिवंडीत आले. त्यापैकी बबलू सेंदुलदुक शेख याच्याकडे त्याच्या नावाने ११ आॅक्टोबर २०१३ रोजी काढलेले ४८७७६२१०२३८४ क्रमांकाचे आधार कार्ड व ईएफएपीएस ८९०२९ हे ३० जून २०१२ रोजी काढलेले पॅन कार्ड आढळले, तर सुद्दाम आबुल खालीद अन्सारी याच्या नावाचा दिनांकाचा उल्लेख नसलेले पॅन कार्ड क्र. डीडीटीडीपीए ०५४९ आर हे कार्ड सापडले, तसेच रफीक मोहम्मद शहजान अन्सारी याच्या नावाचे बीटीएक्सपीए ६७२२५ हे २४ फेब्रुवारी २०१६ रोजी काढलेले पॅन कार्ड सापडले.
१० बांगलादेशी नागरिकांपैकी पाच जण वर्षापासून ते मागील महिन्यापर्यंत भिवंडीत येऊन राहत असल्याचे आढळले. आरोपींनी हे पॅन कार्ड व आधार कार्ड बनावट कागदपत्रे दाखल करून मिळवल्याचे उघड झाले आहे. आधार कार्ड व पॅन कार्डच्या सरकारी यंत्रणेमधील भ्रष्ट कारभार उघडकीस आला आहे. पोलिसांनी ही सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली असून, ती कुणाकडे व कशी काढली, याचा तपास सुरू केला आहे (प्रतिनिधी)

Web Title: Base card found by Bangladeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.