भविष्यात जैवइंधनाचा वापर ठरेल मूलभूत आधार, केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 02:24 AM2018-12-24T02:24:49+5:302018-12-24T02:25:13+5:30

वाढते नागरिकरण त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस झाडांची कमी होत चाललेली संख्या याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे.

The base of the future will be the use of biofuels in future, Union Minister Nitin Gadkari | भविष्यात जैवइंधनाचा वापर ठरेल मूलभूत आधार, केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी

भविष्यात जैवइंधनाचा वापर ठरेल मूलभूत आधार, केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी

googlenewsNext

पुणे : वाढते नागरिकरण त्यासोबत वाढणारी वाहनांची संख्या यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडत चालले आहे. दिवसेंदिवस झाडांची कमी होत चाललेली संख्या याचा परिणाम पर्यावरणावर होत आहे. सध्या देशात पेट्रोल, डिझेल यांना पर्याय ठरू शकतील, अशा इंधनांवर संशोधन सुरू आहे. नजीकच्या काळात जैवइंधनाच्या संशोधनावर भर द्यावा लागणार असून दळणवळणाकरिता जैवइंधनाचा वापर मूलभूत आधार ठरेल, असे मत केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यावतीने आयोजिण्यात आलेल्या उत्कृष्ट समाजसेवक, पत्रकार आणि जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ््यात ते बोलत होते. खासदार अनिल शिरोळे, पालकमंत्री गिरीश बापट, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी, राज्य संघटक संजय भोकरे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी तमिळनाडूतील ईशा फाऊंडेशनचे सद्गुरु (जग्गी वासुदेव) यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

‘लोकमत’च्या बातमीदार नम्रता फडणीस यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याचबरोबर पराग पोतदार, शुभांगी करवीर, पांडुरंग शेलार, राजेश पांडे, राजा शिंदे आदी पत्रकारांचा गौरव करण्यात आला.

गडकरी म्हणाले, ‘‘देशात इंधनाकरिता भविष्यात जैवइंधनाच्या निर्मितीला प्रोत्साहन द्यावे लागणार आहे. इथेनॉल, बायोगॅस यांसारख्या प्रकल्पांना उत्तेजन देऊन त्यांचा उपयोग वाहतुकीसाठी करता येणार आहे. राज्यात तांदूळ, कापूस आणि तण यांपासून इंधन तयार केले जात आहे. तसेच इथेनॉलपासून पर्यावरणात नष्ट होणाऱ्या बायो प्लॅस्टिकची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. याबरोबरच पर्यावरणाच्या संवर्धनाकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. प्रदूषणामुळे पर्यावरणाचा ºहास होत आहे. भविष्यात त्याची हानी रोखण्याकरिता आतापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या पर्यायी सोयी-सुविधांचा विचार करावा लागेल.’’ बंबार्डी, बोर्इंग, एटीसी या कंपन्यांनी बायो इंधन वापरण्याकरिता आता संमती दिली आहे, तर महाराष्ट्रात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील आदिवासी भागात, नदीकिनारी याबरोबरच विविध ठिकाणी ४० कोटींची वृक्षलागवड के ली आहे.

जमिनी शिल्लक राहिल्या तरच टिकेल अस्तित्व
1 वाढत्या औद्योगिकीकरणाच्या हव्यासापोटी होणाºया पर्यावरणाच्या हानीमुळे आता आपल्याला जमिनीची कमतरता जाणवू लागली आहे. ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या जागी उद्योगधंदे वाढत आहेत. त्याच्या प्रभावामुळे नद्या दूषित झाल्या आहेत. याकरिता सातत्याने गंगा, यमुनासारख्या नदीच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे लागतात.
2 जमिनीच्या तुटवड्यामुळे आता गावे बकाल झाली आहेत. अशा वाढत्या उद्योगधंद्याच्या अतिक्रमणामुळे भविष्यात मानवी अस्तित्व टिकवण्यासाठी जमिनी शिल्लक राहणे गरजेचे आहे, असे मत ईशा फाउंडेशनचे संस्थापक सद्गुरू (जग्गी वासुदेव) यांनी व्यक्त केले. नजीकच्या काळात शेती करणे सोपे राहणार नाही.
3 शेतकºयांचीच मुले शेती करण्यास धजावणार नाहीत, कारण शेतजमिनीची होत चाललेली कमतरता. आपण दरवेळी गंगा अस्वच्छ झाली, अशी ओरड करतो. मात्र तिच्या सुधारणेसाठी सक्रिय सहभाग घेत नाही. आपल्यातील अस्वच्छपणा जोपर्यंत दूर होणार नाही तोपर्यंत गंगा कशी स्वच्छ होईल? असा सवालही सद्गुरू यांनी यावेळी उपस्थित केला.


राजकारणात ८०% समाजकारण हवे - नितीन गडकरी

पुणे : लोकसेवा हेच खरे समाजकारण आणि राजकारण असून अटलबिहारी वाजपेयी यांनी शोषित, दलितांचा सामाजिक व आर्थिक न्यायाचा प्रश्न सोडविण्यासोबतच चांगला विचार आणि प्रेरणा दिली. देश व समाजाकरिता जीवन समर्पित करणाºया अटलजींनी आयुष्यभर राष्ट्रभक्तीचा परिपाठ दिला. राजकारणात ८० टक्के समाजकारण करून शिक्षण, आरोग्यासारख्या क्षेत्रात काम करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त पुण्यामध्ये संकल्प ५ हजार रक्तदात्यांचा या संकल्पनेवर आधारित भव्य रक्तदान महायज्ञाचे आयोजन करण्यात आले. नगरसेवक हेमंत रासने मित्रपरिवारातर्फे आयोजित हे शिबिर बाजीराव रस्त्यावरील नू. म. वि. प्रशालेमध्ये झाले. याच्या उद््घाटनप्रसंगी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, मुख्य आयोजक नगरसेवक हेमंत रासने, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, भाजपा पुणे शहराध्यक्ष योगेश गोगावले, आमदार मेधा कुलकर्णी, स्थायी समिती अध्यक्ष योगेश मुळीक, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते.
रक्तदान महायज्ञाकरिता ससून ब्लड बँक पुणे, पी. एस. आय. ब्लड बँक पुणे, जनकल्याण रक्तपेढी पुणे, जनकल्याण रक्तपेढी नगर, जनकल्याण रक्तपेढी जालना, अक्षय ब्लड बँक पुणे, अक्षय ब्लड बँक सातारा, अक्षय ब्लड बँक मिरज, पुणे ब्लड बँक, आय. एस. आय. ब्लड बँक पुणे, घोलप ब्लड बँक पुणे, पिंपरी चिंचवड ब्लड बँक, भारती ब्लड बँक आदी रक्तपेढ्या सहभागी झाल्या. यामुळे एकाच वेळी महाराष्ट्राच्या विविध भागातील रक्तपेढ्यांना मोठ्या प्रमाणात रक्त उपलब्ध झाले. विविध महाविद्यालये, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळांसह पुणेकर शिबिरात सहभागी झाले होते.

अटलजींना श्रद्धांजली
पाच हजार रक्तदात्यांनी रक्तदानातून अटलजींना दिलेली ही खरी श्रद्धांजली आहे. अटलजींच्या कविता, भाषणे, विचार यातून देशासाठी समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा प्रत्येकाला मिळत आहे. रासने म्हणाले, की विज्ञानाची प्रगती सुरू असली, तरी आजपर्यंत आपण मानवी रक्ताला पर्याय उपलब्ध करू शकलेलो नाही. आपण दान केलेल्या रक्ताने एखाद्याचे प्राण वाचू शकतात, ही भावना प्रत्येकामध्ये रुजणे गरजेचे आहे, असे गडकरी म्हणाले.

Web Title: The base of the future will be the use of biofuels in future, Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.