बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

By admin | Published: April 27, 2016 12:57 AM2016-04-27T00:57:37+5:302016-04-27T00:57:37+5:30

बीआरटीची सेवा देण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

'Bashing' of BRT knee | बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

बीआरटीचे गुडघ्याला ‘बाशिंग’

Next

पुणे : सध्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, १५ मेनंतर दौंड तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पुणेकरांनी पाण्याची थोडीशी बचत केल्यास दौंडसाठी ०.५० टीएमसी पाणी सोडणे शक्य आहे. याबाबत पालकमंत्र्यांसह शहर आणि जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करून पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पांतील चार धरणांमध्ये आजअखेर ५.५० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये पुणे शहराला १५ जुलैपर्यंत पुरेल यासाठी ३.८० टीएमसी पाणी, बाष्पीभवन ०.९० टीएमसी, ग्रामपंचायती, एनडीए व अन्य संस्था ०.२७ टीएमसी व पुणे महापालिकेला पाईपलाईनचे प्रेशर टिकवण्यासाठी ०.३० टीएमसी पाणी लागणार आहे. त्यानंतर प्रकल्पात ०.४० टीएमसी पाणी शिल्लक राहते. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.५० टीएमसी पाणी आवश्यक आहे. महापालिकेला ठरलेल्या कोट्यानुसार पाणी देऊन प्रशासनाकडे ०.४० टीएमसी पाणी शिल्लक आहे. दौंड शहराला पाणी सोडण्यासाठी ०.१० टीएमसी अधिक पाण्याची आवश्यकता आहे. पुणेकरांनी आठ-दहा दिवस पाण्याची किमान दहा-बारा टक्के बचत केल्यास दौंडला पुढील अडीच महिने पुरेल एवढे पाणी देता येईल, असे राव यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)
>इंदापूरला पाणी देणे शक्य नाही
दरम्यान, खडकवासला प्रकल्पातून इंदापूरला पाणीपुरवठा करण्यासाठी तब्बल १.६५ टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे. १.६५ टीएमसी पाणी सोडले, तरी प्रत्यक्ष इंदापूरपर्यंत केवळ ०.४० टीएमसीच पाणी
पोहोचेल. त्यामुळे धरणांमध्ये शिल्लक असलेला पाणीसाठा आणि पाणी सोडल्यानंतर पाण्याचा होणारा प्रचंड अपव्यय विचारात घेऊन इंदापूर तालुक्यासाठी पाणी सोडणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी स्पष्ट केले.
>पालकमंत्री करणार खडकवासला कालव्याची पाहणी
शहराला पाणीपुरवठा करताना होणारी पाणी गळतीची पाहणी करणे व त्यावर उपाय-योजना करण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट बुधवारी (दि.२७) पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, वारजे पंपिंग स्टेशन, खडकवासला धरण आणि कालवा याची पाहणी करणार आहे. त्यानंतर संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पाणीगळती रोखण्यासाठी काय उपाय-योजना कराव्या लागणार आहेत, याबाबत चर्चा करणार आहेत.
>पाणीबचत करण्यासाठी पालिकेकडून आवश्यक उपाययोजना नाही
महापालिकेने सप्टेंबरपासून पाणीकपात केली असल्याचे सांगितले जात असले, तरी सध्या पाणी पुरवठा करताना होणारा पाण्याचा प्रचंड अपव्यय थांबविण्यासाठी आवश्यक उपयायोजना केल्या नसल्याचे मत जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी व्यक्त केले. अनेक वर्षांपासून कॅनॉलची गळतीची दुरुस्ती करण्याची मागणी केली जात असताना यासाठी किमान सात-आठ दिवस कॅनॉल बंद ठेवण्यासंदर्भातदेखील सकारात्मक विचार करण्याची गरज असल्याचे राव यांनी सांगितले.

Web Title: 'Bashing' of BRT knee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.