गणिताचे ‘बेसिक’च कच्चे
By Admin | Published: January 15, 2015 01:01 AM2015-01-15T01:01:04+5:302015-01-15T01:01:04+5:30
साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या
नागपूर विभागातील शाळांमधील वास्तव
योगेश पांडे - नागपूर
साधारणत: इयत्ता तिसरी ते पाचवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना बजाबाकी यावी असे अपेक्षित असते. परंतु नागपूर विभागातील ७१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकीच येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या गणिताचा पायाच कच्चा असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रथम संस्थेने मांडलेल्या ‘असर’च्या (अॅन्युअल स्टेटस आॅफ एज्युकेशन रिपोर्ट) अहवालातील आकड्यांनी या वास्तवावर प्रकाश टाकला आहे. या अहवालातील आकडेवारीनुसार राज्यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या सरासरी ८२ टक्के विद्यार्थ्यांची वजाबाकी कच्ची आहे.
देशातील शिक्षणप्रणालीच्या स्थितीवर सर्वेक्षण करणाऱ्या ‘असर’च्या आकडेवारीनुसार नागपूर विभागातील शाळांत शिकणाऱ्या तिसरी ते पाचवीतील केवळ २९.०१ टक्के विद्यार्थ्यांना वजाबाकी जमते. यात सर्वाधिक ३९.९ टक्के प्रमाण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर सर्वात कमी टक्केवारी गडचिरोली (१८.१ टक्के ) येथे आहे.
राज्यातील याच मुद्यावरील सरासरी टक्केवारी ३२.८३ टक्के इतकी आहे. नागपूर विभागाखालोखाल औरंगाबाद ( २६.९५%) आणि अमरावती (२१.७५%) यांचा क्रमांक लागतो.