सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण!

By admin | Published: August 31, 2014 12:17 AM2014-08-31T00:17:10+5:302014-08-31T00:17:10+5:30

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाचे सामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचे ठरणार

On the basis of social equality! | सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण!

सामाजिक आधारावर ठरणार निवडणुकीचे समीकरण!

Next
पुणो : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येकच राजकीय पक्षाचे सामाजिक आधार अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून, हा बदलणारा सामाजिक आधार आणि तो समजावून घेऊन आपला पारंपरिक मतदार टिकवून ठेवण्यात आलेल्या यशावरच निवडणुकीचे समीकरण ठरणार असल्याचे मत राजकीय विेषकांनी व्यक्त केले आहे. 
महाराष्ट्रातील राजकीय पक्षांचे सामाजिक आधार झपाटय़ाने बदलत आहेत़ आजवर दुर्लक्षित असलेल्या समाजघटकातील जातींच्या राजकीय आकांक्षा वाढू लागल्या आहेत़ त्यांच्या आकांक्षाना नवे धुमारे आणण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या पक्षांकडून होत आह़े 
राज्यशास्त्र विश्लेषक प्रा़ प्रकाश पवार यांच्या मते, ‘काँग्रेसचे स्वत:चे असे व्होटबँकेचे (मतपेटीचे) मॉडेल होत़े त्यात दलित, आदिवासी 25 टक्के, अल्पसंख्याक 15 टक्के आणि प्रबळ जात 1क् ते 12 टक्के यांचा समावेश होता़ या पारंपरिक व्होटबँकेकडे शेती, उद्योग आणि मोठी संख्या एकवटली होती़ 1984च्या सुमारास उत्तर भारतात दलितांचा स्वतंत्र पक्ष अस्तित्वात आला़ 
रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र राजकारण सुरू झाल़े त्यातून काँग्रेसचा सामाजिक जनाधार कमी होत गेला़ जेव्हा व्होटबँक हलते तेव्हा नवे समाज घटक जोडणो आवश्यक असते, ते न केल्यास पराभव होण्याची शक्यता असत़े’ 
राज्यशास्त्रचे अभ्यासक प्रा़ यशवंत सुमंत म्हणतात, ‘राजकीय पक्षांचा जनाधार बदलला की जागे झालेले समाज घटक निर्माण झालेली पोकळी भरून काढतात़ याचे प्रत्यंतर नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये दिसून आल़े पक्ष संघटना, नेतृत्वाचे व्हिजन, विविध पातळीवर दाखवत नाही़ समाज घटकातील संघर्षाकडे काळजीपूर्वक पाहिले पाहिज़े समाजाची गरज ओळखून नेता, पक्ष आपल्याला काहीना काही दिशा देऊ शकतात, हा विश्वास जेव्हा समाजात निर्माण होतो, त्या वेळी जनता त्या पक्षाकडे, नेत्याकडे वळत़े’
 
मराठा, धनगर आणि बडय़ा बागायतदारांची व्होटबॅँक 
1राज्यातील शिवसेना-भाजपा युतीने यंदाच्या निवडणुकीत केलेली महायुती ही केवळ नावापुरती नव्हती तर त्यांनी शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून  मराठा, राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून धनगर, रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन दलित आणि कॉँग्रेसची ताकद असलेले बडे बागायतदार आपल्याकडे खेचण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोबत घेतले. 
 
2त्यामुळे त्यांची व्होटबँक तयार होत गेली़ याला उत्तर देण्यासाठी कॉँग्रेस आघाडीने कोणतीही पावले 
उचलली नाहीत. त्यामुळे सत्तारूढ पक्ष आपल्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा समज या छोटय़ा-छोटय़ा समाज घटकांमध्ये बिंबविला गेला़ 
3त्याचे प्रतिबिंब लोकसभेच्या निवडणुकीत उमटल्याचे दिसून आल़े हे समाज घटक आता कोणाला साथ देणार यावर आगामी विधानसभा निवडणुकीचे यशापयश अवलंबून असेल़  
 
काँग्रेसने राज्यात मराठा जाती व प्रत्येक जातीचा एक अभिजन बनविला़ त्याला सत्ता दिली़ जाती समूहांना बांधून ठेवायचा प्रयत्न केला गेला़ जातीचे समीकरण आणि आर्थिक हितसंबंध जेव्हा जोपासले गेले नाहीत तेव्हा या जाती सत्ताधा:यांना सोडून विरोधकांकडे गेल्या़  लोकसभा निवडणुकीला काँग्रेस आक्रमकपणो सामोरे गेली नाही़ त्याचबरोबर निवडणुकीचे मॅकेनिझम समजून घेण्यास कमी पडल़े भाजपाने हे मॅकेनिझम समजून घेऊन कृती केल्याने त्यांना यश मिळाले.’
- प्रा. प्रकाश पवार, राजकीय विेषक 
 
लोकसभा निवडणुकीनंतर आरक्षणाद्वारे सामाजिक न्याय देण्याचा प्रयत्न केला जात आह़े या समाजासाठी काहीना काही करतोय हे दाखविण्याचा प्रयत्न होतोय़ आपल्याकडील निवडणुकांमधील अनेक समाज घटक हे ऐनवेळी कार्यरत होतात़ बिहारमधील पोटनिवडणुकीत वेगळे फोर्सेस कामाला लागल़े आगामी निवडणुकीतही असे अनेक घटक ऐनवेळी आपल्या भूमिका बदलू शकतील़
-प्रा. यशवंत सुमंत, राजकीय अभ्यासक 
 

 

Web Title: On the basis of social equality!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.