ही पालिका कर वसुलीसाठी घेणार विद्यार्थ्यांचा आधार
By Admin | Published: November 16, 2016 05:36 PM2016-11-16T17:36:34+5:302016-11-16T17:36:34+5:30
मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातुन जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ता कर वसुल केला आहे.
राजू काळे
भाईंदर, दि. १६ - मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातुन जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ता कर वसुल केला आहे. ही वसुली एकुण उद्दिष्टापैकी सुमारे साडेआठ टक्के एवढीच असल्याने ती अधिकाधिक होण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने जुन्या हजार, पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी पालिकेला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे. तत्पुर्वी पालिकेने चलनातुन बाद झालेल्या नोटा १० नोव्हेंबरपासुन कराच्या माध्यमातुन स्विकारण्यास सुरुवात केली. १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत पालिकेने विविध कराच्या माध्यमातुन सुमारे २४ कोटींची वसुली केली. हा आकडा १६ नोव्हेंबरपर्यंत ४ कोटींनी वाढला. एकुण २८ कोटींची कर वसुली पालिकेने जुन्या नोटांच्या आधारावर वसुल केली असली तरी कित्येकांनी आपले काळे धन कराच्या माध्यमातुन पांढरे केल्याचे बोलले आहे. तुर्तास सरकारने त्यावर अंकुश ठेवलेला नाही. यात पालिकेच्या उत्पन्नात मात्र भर पडण्याची संधी उपलब्ध झाल्याने ती कोणत्याही परिस्थितीत दवडायची नाही, असा निर्धार आयुक्तांनी केला आहे.
त्यासाठी १३ नोव्हेंबरपासुन अधिकारी, कर्मचाय््राांना करदात्यांच्या दारी धाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे तासागणिक वसुलीचा आकडा वाढत असला तरी तो पर्याप्त ठरलेला नाही. पालिकेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात केवळ मालमत्ता कराचे एकुण उद्दीष्ट १४० कोटींचे निश्चित केले आहे. आजमितीस एकुण कर वसुली ४२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यात यंदाच्या १२ कोटींचा समावेश आहे. एकुण उद्दीष्टापैकी गेल्या साडेसात महिन्यांत पालिकेने एकुण ३० टक्के कर वसुली केली असुन उर्वरीत साडेचार महिन्यांत पालिकेला ७० टक्के मालमत्ता कराची वसुली करावी लागणार आहे. ती २४ नोव्हेंबरपर्यंत अधिकाधिक होण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे करवसुलीची मोहिम सुरु केली जाणार आहे.
या मोहिमेत विद्यार्थ्यांना सामील करुन घेण्यासाठी १६ नोव्हेंबरला दुपारी ४ वा. भार्इंदर पश्चिमेकडील रिना मेहता महाविद्यालयात शहरातील शाळांचे मुख्याध्यापक व महाविद्यालयातील प्राचार्यांची बैठक घेण्यात आली. त्यात विद्यार्थ्यांना करदात्यांना वाढीव मुदतीत जुन्या नोटांच्या माध्यमातुन कर जमा करण्यासाठी जनजागृती करण्याबाबत निर्देश देण्याचे सांगण्यात आले. जनजागृतीसाठी त्यांना पालिकेमार्फत मोफत हँडबिल वा पॅम्पलेटचे वाटप करण्यात येणार आहे. हि पत्रके प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या घरासह परिसरातील रहिवाशांना वाटुन त्यांना थकीत कर भरण्यासाठी लोकांना प्रवृत्त करावे लागणार आहे.