महिलांना ‘तेजस्विनी’चा आधार
By admin | Published: May 14, 2014 04:48 AM2014-05-14T04:48:10+5:302014-05-14T04:48:10+5:30
महिलांसह तरुणींचा रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी ‘तेजस्विनी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे.
गणेश वाघ, भुसावळ जि. जळगाव - महिलांसह तरुणींचा रेल्वे प्रवास सुखकर होण्यासाठी ‘तेजस्विनी पथका’ची निर्मिती करण्यात आली आहे. कुठल्याही संकटाशी दोन हात करत आणि अडचणीत असलेल्या महिला-तरुणींना या पथकाने मदतीचा हात पुढे केला आहे. एवढेच नाहीतर रेल्वे डब्यातील मजनूंचा या पथकाने केवळ बंदोबस्त केला नाही तर त्यांना वठणीवर आणले आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे आयुक्त चंद्रमोहन मिश्रा यांच्या संकल्पनेतून आॅगस्ट २०१३मध्ये या तेजस्विनी पथकाची स्थापना करण्यात आली. पथकात पाच महिला कर्मचारी आहेत. रेल्वे प्रवासात महिलांच्या डब्यात घुसखोरी करणार्या प्रवाशांसह महिला-तरुणींची छेड काढणार्या मजनूंपासून तर धूम्रपान करणार्या शौकिनांना या पथकातील रणरागिनींनी पकडून दंडात्मक कारवाई केली. एवढेच नाहीतर त्यांना वठणीवर आणण्याचे कामही केले आहे. यामुळे या पथकाचा अख्या भुसावळ विभागात दरारा निर्माण झाला आहे़ २४ तास हेल्पलाइन रेल्वे प्रवासात महिलांची छेडखानी होत असल्यास वा कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार त्यांच्यासोबत होत असल्यास त्यांनी महिला हेल्पलाइन क्रमांक ०२२-२२६१०१८४, ०२५८२-१०१९४ वर संपर्क साधावा.