विधान परिषदेची आज लढाई
By admin | Published: December 27, 2015 02:46 AM2015-12-27T02:46:39+5:302015-12-27T02:46:39+5:30
विधान परिषदेच्या ७ जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत रस्सीखेच आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था
मुंबई : विधान परिषदेच्या ७ जागांच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत असून, त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजपा-शिवसेना युतीत रस्सीखेच आहे. नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक यापूर्वीच बिनविरोध झाली असून, भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास विजयी झाले आहेत. बुधवारी मतमोजणी होणार आहे.
निवडणुकीत दगाफटका होण्याची शक्यता असल्याने शिवसेना, भाजपा, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खबरदारी घेतली जात आहे़ मुंबईतून दोन जण निवडून जाणार आहेत़ शिवसेनेने पर्यावरण मंत्री रामदास कदम, काँग्रेसने भाई जगताप यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे बंडखोर प्रसाद लाड रिंगणात उतरल्याने काँगे्रसची अडचण झाली आहे.
अशा आहेत लढती
अहमदनगरमध्ये विद्यमान आमदार अरुण जगताप (राष्ट्रवादी) आणि युतीकडून प्रा. शशिकांत गाडे (शिवसेना) रिंगणात आहेत. धुळेसाठी काँग्रेसचे अमरिशभाई पटेल व भाजपाचे शशिकांत वाणी यांच्यात लढत होत आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे सतेज पाटील व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार आमदार महादेवराव महाडिक यांच्यात थेट लढत होत आहे.
सोलापूरमध्ये आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार दीपक साळुंखे व भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांच्यात चुरस आहे. अकोला-बुलडाणा-वाशिम मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरीया व काँग्रेस-राष्ट्रवादीचे रवींद्र सपकाळ यांच्यात सरळ लढत होत आहे.
मतदार संघजागा
मुंबई२
कोल्हापूर१
धुळे-नंदुरबार१
अहमदनगर१
अकोला-बुलडाणा
-वाशिम१
सोलापूर१
- नागपूरमधील एका जागेवर भाजपाचे व्यास बिनविरोध निवडून आले आहेत.