धावण्याआधीच मेट्रोची लढाई!

By Admin | Published: June 8, 2014 01:31 AM2014-06-08T01:31:16+5:302014-06-08T01:31:16+5:30

मेट्रोचे श्रेय आपणाला मिळावे म्हणून घाटकोपर येथे शनिवारी ठाण मांडून बसलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार किरिट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी अक्षरश: आकाशपाताळ एक केले.

Battle of the Metro before running! | धावण्याआधीच मेट्रोची लढाई!

धावण्याआधीच मेट्रोची लढाई!

googlenewsNext
>मेट्रोत राजकारण : भाजपा खासदारांची घाटकोपरमध्ये घोषणाबाजी
मुंबई : मेट्रोचे श्रेय आपणाला मिळावे म्हणून घाटकोपर येथे शनिवारी ठाण मांडून बसलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार किरिट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी यांनी अक्षरश: आकाशपाताळ एक केले.
केंद्रीय रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो कोणत्याही क्षणी सुरू होण्याची शक्यता होती. वाद होता तो केवळ मेट्रोच्या तिकीट दराचा. पहिले 3क् दिवस 1क् रुपये तिकीट आकारत एमएमओपीएलने प्रवाशांना दिलासा दिला असला तरी महिन्याभरानंतर तिकीट दर 1क्, 2क्, 3क् आणि 4क् असे होणार असून, यात प्रवासी पिचले जाणार आहेत. 
यावर मुख्यमंत्र्यांनी रिलायन्सचे कान टोचले आहेत. मात्र तरीही रिलायन्सने तिकीट दरवाढीचा हेका कायम ठेवला आहे. 
दरम्यान, हे सर्व नाटय़ घडत असतानाच आपणाला मेट्रोचे  ‘प्रथम प्रवासी’ असा मान मिळावा म्हणून किरिट सोमय्या आणि गोपाळ शेट्टी घाटकोपर येथे आपापल्या कार्यकत्र्यासोबत दाखल झाले होते. विशेष म्हणजे त्यांनी सत्ताधा:यांविरोधात घटनास्थळी घोषणाबाजीही केली. शिवाय आम्हाला मेट्रोमध्ये प्रवेश करता येऊ नये म्हणून मेट्रोचे दरवाजे लॉक करण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. 
ही घोषणाबाजी सुरू असतानाच आंदोलनकत्र्याना आवरण्यासाठी घटनास्थळी उपस्थित पोलिसांच्या फौजफाटय़ाने आंदोलनकत्र्याना ताब्यात घेत येथे शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. 
 
रिलायन्सने पुढे केली अतिरिक्त खर्चाची ढाल!
च्मेट्रो रेल्वे उभारणीसाठी 
2 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च आणि 2क्क्4 सालच्या तुलनेत 2क्14 सालार्प्यत वाढलेले 
महागाईचे प्रमाण यावर 
लक्ष केंद्रित करत रिलायन्सने तिकीट दराचा विषय ताणून धरला आहे.
च्वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो प्रकल्पाचा मूळ खर्च 
2 हजार 356 कोटी होता. त्यापैकी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे रिलायन्सचा हिस्सा 354 कोटी एवढा होता. तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा हिस्सा 
133 कोटी एवढा होता. 
च्शिवाय फ्रान्सच्या व्हेओलिया कंपनीचा हिस्सा 25 कोटी आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पासाठी व्यवहार्यता निधी 65क् कोटी आहे. त्यापैकी केंद्राकडून अतिरिक्त साहाय्य निधी म्हणून 471 कोटी आणि उर्वरित 179 कोटी रुपये मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिले आहेत.
 
च्मेट्रोचे तिकीट दर करारनामा करताना जे निश्चित केले होते; तेच अंतिम करत राज्य सरकारने स्वत:ला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करावा आणि मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
च्पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अंतर्गत ज्या वेळी प्रत्यक्ष करारनामा झाला त्या वेळी मेट्रो अॅक्ट नव्हता आणि बसच्या दीडपट भाडे आकारण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र सद्य:स्थितीमध्ये मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सरकार आणि मुंबईकरांची फसवणूक करीत आहे. 
च्मेट्रोचा जरी खर्च वाढला असला तरी त्यास मुंबईकर जबाबदार नाहीत. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि एमएमआरडीएचा ढिसाळ कारभार यास जबाबदार आहे.
च्मेट्रोचे कमीतकमी भाडे 9 रुपये आणि अधिकाधिक 13 रुपये निश्चित करण्यात यावे. मात्र मेट्रोचे भाडे किती असावे, याहून मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने मनमानी सुरू केली आहे. 
च्शिवाय 9 रुपयांऐवजी 1क् आणि 13ऐवजी 4क् रुपये भाडे वसूल करण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरू आहे. शिवाय राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्नही केला जात आहे, असे  अथक सेवा संघाचे अध्यक्ष अनिल गलगली यांनी सांगितले. 
 
एमएमओपीएलने सरकारला कोंडीत पकडले
कंपनीने प्रकल्पाचा खर्च 4,321 कोटींच्या घरात गेल्याचे म्हटले. 2 हजार कोटींहून अधिक खर्च मेट्रोला करावा लागला. त्यामुळे तो खर्च मिळावा म्हणून कंपनीने एमएमआरडीएला प्रस्ताव पाठविला होता. मात्र मुळातच हा प्रकल्प पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर आहे. त्यामुळे अतिरिक्त खर्च देण्याचा प्रश्न उद्भवत नाही, अशी भूमिका प्राधिकरणाने मांडली. यावरच आता एमएमओपीएलने तिकीट दराच्या मुद्दय़ांहून सरकारला कोंडीत पकडले आहे.
 
महिलांना जागा आरक्षित
मेट्रोच्या डब्यांमध्ये वरिष्ठ नागरिक, अपंग, महिलांसाठी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. मेट्रोत उभे राहण्यासाठीही मुबलक जागा आहे. शिवाय तातडीची वैद्यकीय सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. मेट्रो रेल्वेची अंधेरी आणि घाटकोपर ही सर्वात मोठी स्थानके आहेत. स्थानकांवर एटीएम मशिन्स, मोबाइल शॉप, माहिती केंद्र, तिकिटासाठी मुबलक खिडक्या आदी सुविधा प्रदान करण्यात आल्या आहेत.
 
मेट्रो रेल्वे ही डी.एन. नगर, आझादनगरहून पश्चिम रेल्वेच्या अंधेरी पुलाहून दोन्ही बाजूंना असलेले काँक्रीटचे जंगल पार करणार आहे. शिवाय पूर्वेकडील अंधेरी रेल्वे स्थानक आणि नंतर पश्चिम द्रुतगती मार्गावरील जोग पूल असे बरेच अंतर कापणार आहे. चकाला, विमानतळ मार्ग, साकीनाका परिसरातील दोन्ही बाजूंना असलेल्या गगनचुंबी इमारती, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचा नजारा, साकीनाका, असल्फा आणि जागृतीनगरदरम्यान वसलेल्या झोपडय़ा, बैठय़ा चाळी, डोंगरावर वसलेल्या झोपडय़ा अशा अध्र्या मुंबईचे दर्शन मेट्रो प्रवाशांना प्रवासादरम्यान घडविणार आहे. 
 
मुंबई : हार्बर, मध्य, पश्चिम रेल्वेमार्गावरील दाटीवाटीच्या गर्दीतून प्रवास करणा:या मुंबईकरांना आता सुसज्ज अशा वातानुकूलित मेट्रो रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवास आरामदायी असणार असून, या प्रवासाच्या निमित्ताने का होईना मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
 
मेट्रोचे श्रेय आपणाला मिळावे म्हणून राष्ट्रवादीच्या येथील स्थानिक कार्यकत्र्यानी घाटकोपर येथे दाखल होत नारळ फोडून मेट्रोचे उद्घाटन झाल्याचे जाहीर केले. मात्र राजकीय पुढा:यांच्या घाटकोपर येथील ठिय्या आंदोलनामुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडली होती. तब्बल एक तास येथे वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.
 
मुंबईकरांचा प्रवास झाला सोपा
रविवारपासून मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याने पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील वाहतुकीवरील ताण काहीसा कमी होईल. पूर्व उपनगरांसह ठाणो, कल्याण, नवी मुंबई, पनवेलहून घाटकोपरमार्गे अंधेरीला जाणा:या चाकरमान्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. घाटकोपरहून बेस्ट, रिक्षा किंवा टॅक्सीने हे चाकरमानी अंधेरीला पोहोचतात किंवा लोकलने दादरमार्गे अंधेरी गाठतात. 
त्यातही घाटकोपरहून अंधेरीला जायला कमी वेळ लागतो. मात्र या मार्गावर घाटकोपरपासूनच वाहतूक कोंडीला सुरुवात होते ती अंधेरीर्पयत कायम राहते. असल्फा, चकाला, साकिनाका, मरोळ, एअरपोर्ट परिसर येथे सकाळी आणि संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळेच अवघ्या 12 किलोमीटरचे अंतर गाठण्यासाठी चाकरमान्यांना दीड ते दोन तासही लागतात.  मेट्रोमुळे  हा प्रवास फक्त 21 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे.  विशेषत: मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल मुंबईकरांना दिलासा देण्याचे काम करत असतानाच चेंबूर-वडाळा या मार्गावर सुरू झालेल्या मोनोरेलने मुंबईकरांना दिलासा दिला आहे. आता थेट वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या वर्दळीच्या मार्गाहूनच मेट्रो धावणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सोपा होणार आहे. मध्य रेल्वेवरील प्रवाशांना अंधेरी गाठायचे म्हटल्यावर दादरला येण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. कुर्ला अथवा घाटकोपरहून अंधेरीसाठी बेस्ट बस उपलब्ध आहेत. मात्र वाहतुकीच्या कोंडीमुळे प्रवाशांचा प्रवासात तब्बल एक ते दीड तास जात होता. हीच गत पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांची घाटकोपरला जाताना होत होती. मात्र आता मेट्रोसारखी रेल दिमतीला आल्याने प्रवाशांना थेट घाटकोपरहून अंधेरी आणि अंधेरीहून घाटकोपर गाठणो शक्य होणार आहे.

Web Title: Battle of the Metro before running!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.