भाजपच्या बालेकिल्ल्यात अस्तित्त्वाची लढाई

By admin | Published: January 31, 2017 03:34 PM2017-01-31T15:34:42+5:302017-01-31T15:34:42+5:30

भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत.

The battle for survival of the BJP's coffin | भाजपच्या बालेकिल्ल्यात अस्तित्त्वाची लढाई

भाजपच्या बालेकिल्ल्यात अस्तित्त्वाची लढाई

Next

मुंबई : भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या मुलुंडमध्ये येत्या पालिका निवडणुकीत सत्तेतील मित्रपक्षासोबत दोन हात करावे लागणार आहेत. याची सुरुवात दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर झालेल्या पालिकेच्या भ्रष्टाचाररुपी रावण दहनावरुन झाली आहे. याचाच फायदा उचलून दोघांच्या भांडणात राष्ट्रवादी, मनसे आणि कॉंग्रेस आपली पोळी भाजून घेण्यास सुरुवात केली आहे.
मुलुंड पश्चिमेकडील मुलुंड कॉलनी, शंकर टेकडी असे काही डोंगराळ भागातील झोपडपट्टी सोडल्यास टोलेजंग इमारतींनी हा परिसरत व्यापला आहे. जवळपास पावणे चार लाखांची लोकसंख्या असलेल्या मुलुंडमध्ये गुजराती भाषिक अधिक आहे. तर मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनी, गव्हाणपाडा, नाणेपाडा अशी मराठी वस्तींचा यात समावेश आहे. नवीन वॉर्ड रचनेमुळे कुठे खुशी कुठे गमचे चित्र पहावयास मिळते. पक्षांतर्गतच युद्ध पेटल्याने यात आणखीनच रंग चढत आहे.
मुंबई शहराचे उपनगर असलेले मुलुंड हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडून आहे. शिवाय पूर्व उपनगरातील कालिदास नाट्यगृह याच परिसरात आहे. तर मुलुंड, भांडुप, कांजूर मधील रहिवाशांसाठी असलेले अग्रवाल रुग्णालयही याच भागात आहे. अशी महत्त्वपूर्ण ठिकाणे असलेल्या मुलुंडमध्ये सध्या हरिरोम नगर डम्पिंग ग्राऊण्डचा मुद्दा महत्त्वाचा आहे. हा मुद्दा घेऊन नेतेमंडळीच्या श्रेय लाटण्याचे राजकारणही दिसून येत आहे. तर काही जण पश्चिमेकडील वन विभागाच्या मुद्दयावर निवडणुकीत उतरणार आहे. या व्यतिरिक्त झोपडपट्टी पुनर्वसन, रस्ते, नाले, पाणी या देखील प्रमुख समस्या आहेत. त्यामुळे अशात नगरसेवकासाठी मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु झाली आहे.
मुलुंडमधील सहा प्रभागांपैकी १०५ आणि १०७ हा महिलांसाठी खुला झाला आहे. तर १०३, १०६, आणि १०८ हा सर्वसाधारण खुला झाला असून १०४ हा इतर मागासवर्गीय
(ओबीसी) झाल्याने सर्वांचीच पळापळ सुरु आहे. मुलुंडमध्ये भाजपा आमदार सरदार तारासिंग यांची याच भागात आमदारकीची चौथी वेळ अहे. अशात भाजपाचे मनोज कोटक, प्रकाश गंगाधरे, समीता कांबळे हे तीन नगरसेवक आहे. तर राष्ट्रवादीचे नंदकुमार वैती, मिनाक्षी सुरेश पाटील, मनसे नगरसेविका सुजाता पाठक आहेत. अशात नवीन वॉर्ड रचनेमुळे वैती आणि गंगाधरे यांचा वॉर्ड महिला झाल्याने त्यांना धक्का बसला आहे. गंगाधरे १०४ मधून तर वैती १०६ मधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहे. तर नव्याने तयार झालेल्या १०३ वॉर्डमधून भाजपा नगरसेवक मनोज कोटक यांनी फिल्डींग लावली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात गुजराती वर्गाबरोबरच उच्च भ्रू लोकवस्तीचा भरणा आहे. मात्र अखेर पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र जर पक्षाने उभे केले नाही तर अनेक जण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे.
यावेळी शिवसेना भाजप मध्ये रावण दहनावरुन सुरु असलेल्या वादाचा तणाव निवडणुकीत रंगणार आहे. सेनेचा वडापाव हातून गेल्याने भाजप कार्यकत्यांना जिलेबी फाफड्या बरोबरच बिर्याणीचे बेत आखण्यासाठी आर्थिक गणित मांडली जात आहे. आतापासून त्यांनी रिपाईंच्या कार्यकर्त्यांना हाताशी धरले आहे. मतदारांना खुश करण्यासाठी हिशोबांची मांडणीही सुरु केली आहे. त्यामुळे मुलुंडमध्ये तरी निवडणूकीत पैशांचा पाऊसात उमेदवार, कार्यकर्ते यांना ओढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहे.
.............................
प्रभाग क्रमांक - १०३
आरक्षणखुला
लोकसंख्या
एकूण- ६१०७१
अनुसूचित जाती - ३१५३
अनुसूचित जमाती -९५६
व्याप्ती - भांडूप कॉम्प्लेक्स, विहार लेक, वीणानगर, घाटीपाडा या प्रमुख ठिकाणांचा यात समावेश आहे.
........................
प्रभाग क्रमांक - १०४
आरक्षणइतर मागासवर्गीय
लोकसंख्या -
एकूण- ५९०९७
अनुसूचित जाती - ५५९१
अनुसूचित जमाती - ११६७
व्याप्ती -तांबेनगर, इंदिरानगर, सिद्धार्थनगर
....................
प्रभाग क्रमांक - १०५
आरक्षणखुला(महिला)
लोकसंख्या -
एकूण- ५२९६२
अनुसूचित जाती - २४८५
अनुसूचित जमाती - १२८८
व्याप्ती - गव्हाणपाडा,निलमनगर, सज्जनवाडी, पाटीलनगर, डॉ.आंबेडकरनगर.....................
प्रभाग क्रमांक - १०६
आरक्षणखुला
लोकसंख्या -
एकूण- ४९९५६
अनुसूचित जाती - २७०७
अनुसूचित जमाती - १२९७
व्याप्ती -हरि ओमनगर, म्हाडा कॉलनी, डम्पिंग सॉल्ट लेक, टाटा कॉलनी, नवघर
......................
प्रभाग क्रमांक - १०७
आरक्षणखुला (महिला)
लोकसंख्या -
एकूण- ६१२३५
अनुसूचित जाती - २०४६
अनुसूचित जमाती - १०७८
व्याप्ती - नाहूर गावठाण, मुलुंड बेस्ट बस डेपो, सेंट पायस कॉलनी
......................
प्रभाग क्रमांक-१०८
आरक्षणखुला
लोकसंख्या
एकूण- ५७१४२
अनुसूचित जाती -७२३२
अनुसूचित जमाती -१०९८
व्याप्ती - राहूलनगर, मोतीनगर, हनुमानपाडा, आशानगर
................
२०१२ मधील विजयी आणि पराभूत उमेदवार (जुन्या रचनेनुसार)
वॉर्ड क्र ९८
विजयी उमेदवारसमीता कांबळे (भाजप)- ८३६५
पराभूत नंदा प्रभाकर कांबळे (कॉंग्रेस) - ७९८०
..................
वॉर्ड क्र ९९
विजयी उमेदवारभावना जोबनपुत्रा (भाजपा)-९२७५
पराभूत मिनाक्षी सुरेश पाटील (राष्ट्रवादी) - ८५०१
( दरम्यान बनावट जात प्रमाणपत्रप्रकरणी भावना जोबनपुत्रा अपात्र ठरल्या)
....................
वॉर्ड क्र १००
विजयी उमेदवारनंदकुमार वैती (राष्ट्रवादी) - ९१२६
पराभूत सत्यवान दळवी (मनसे) -८८१०
....................
वॉर्ड क्र१०१
विजयी उमेदवारसुजाता पाठक (मनसे) -९७२०
पराभूत ज्योती वैती (शिवसेना) -८८१४
.....................
वॉर्ड क्र१०२
विजयी उमेदवारप्रकाश गंगाधरे (भाजपा) - १०५५०
पराभूत उत्तम गिते (कॉंग्रेस)- ८६२३
....................
वॉर्ड क्र१०३
विजयी उमेदवार मनोज कोटक (भाजप) - ९३०२
पराभूत जयप्रकाश शेट्टी (कॉंग्रेस) -७४७४
...................

Web Title: The battle for survival of the BJP's coffin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.