सामन्यासाठी बीसीसीआय हायकोर्टात
By admin | Published: April 20, 2016 05:40 AM2016-04-20T05:40:07+5:302016-04-20T05:40:07+5:30
राज्यात भीषण पाणीटंचाई असल्याने उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतरचे आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा आदेश बीसीसीआय व एमसीएला दिला.
मुंबई : राज्यात भीषण पाणीटंचाई असल्याने उच्च न्यायालयाने ३० एप्रिलनंतरचे आयपीएलचे सामने राज्याबाहेर हलवण्याचा आदेश बीसीसीआय व एमसीएला दिला. मात्र, १ मेचा रायझिंग पुणे सुपर जायंट विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना पुण्यातच खेळण्याची परवानगी मिळवण्यासाठी बीसीसीआयने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावर बुधवारी सुनावणी आहे.
आयपीएलच्या सामन्यांसाठी खेळपट्ट्यांच्या देखभालीकरिता लाखो लीटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, राज्यात भीषण पाणीटंचाई आणि दुष्काळी स्थिती असल्याने उच्च न्यायालयाने राज्य सरकारसह बीसीसीआय, एमसीएला फटकारत राज्यातील आयपीएलचे सामने ३० एप्रिलनंतर अन्यत्र हलवण्याचा आदेश दिला. त्यामुळे अनेक तांत्रिक अडचणी नमूद करत, बीसीसीआयने हा सामना पुण्यातच खेळण्याची परवानगी द्यावी, यासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे.