‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 09:28 AM2022-11-20T09:28:21+5:302022-11-20T09:28:56+5:30

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते.

Be careful in Live In Sayings of literary men in Vasai; Expressed outrage over the incident | ‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

‘लिव्ह इन’मध्ये सावधगिरी बाळगा! वसईमधील साहित्यिकांचे म्हणणे; घटनेवर व्यक्त केला तीव्र शब्दात संताप 

googlenewsNext

जगदीश भोवड -

वसई : वसईतील तरुणी श्रद्धा वालकर हिच्याबाबतीत घडलेली घटना ही अमानुष कृत्यात समावेश करावा अशीच असल्याचे मत वसईतील साहित्य वर्तुळात व्यक्त होत आहे. अशा गोष्टी व्हायला लागल्या तर ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणींच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होईल, असे मत वसईतील मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळाचे अध्यक्ष रेमंड मचाडो यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले की, ज्या मुली पालकांना आव्हान देऊन निघून जातात, त्यांच्याबाबतीत पालकांना दोष देता येत नाही. श्रद्धाचे पालक तिला थांबवायला गेले होते. मात्र, ती त्या तरुणाच्या प्रेमात वेडी झालेली असल्याने तिने पालकांचे घर सोडले होते. मात्र, श्रद्धाच्या बाबतीत घडलेल्या घटनेनंतर समाज खडबडून जागा झाला आहे. 

एवढ्या अमानुषपणे आजवर वसईत तरी घटना घडलेली नव्हती. दुसरीकडे अशा घटनांतून धार्मिक तेढ निर्माण होईल, असे काही घडू नये.

माणुसकीला काळिमा 
कोकण मराठी साहित्य परिषदेचे पालघर जिल्हा अध्यक्ष प्रवीण दवणे म्हणाले की, ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. सुशिक्षित आणि वयात आलेल्या मुलींनी आपला मित्र-प्रियकर निवडताना त्याचे विचार, त्याचे आचार, त्याची घरची स्थिती पाहून निर्णय घेणे आवश्यक आहे.

घरातून फारकत घेणे चुकीचे -
डिंपल प्रकाशनचे प्रकाशक अशोक मुळे म्हणाले की, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील श्रद्धा वालकरचा हा प्रकार धक्कादायक आणि माणुसकीला काळिमा फासणारा आहे. इतके अमानुष असे कुणीच वागू शकत नाही, वागूही नये. सध्या  तरुण-तरुणी स्वतंत्र विचारांचे असतात. स्व-कर्तृत्वाचा एक वेगळाच उन्माद त्यात जाणवतो. पण मैत्री करताना, प्रेमात असताना हे भान विसरून घरातून फारकत घेणे चुकीचे आहे. ते नाते टिकले असते तर... हा जर-तरचा प्रश्न असला तरी कुठेतरी संवाद साधायला हवा होता. असे कृत्य करणाऱ्या या कूकर्म्यास तातडीने फाशी द्यायला हवी.

‘श्रद्धा स्वत:बाबत निर्णय घेऊ शकली नाही’ -
ग्रंथप्रेमी प्रकाश जाधव म्हणाले की, श्रद्धाच्या बाबतीत घडलेली घटना पुन्हा घडता कामा नये यासाठी संस्कार जपणे आवश्यक आहे. लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार होणे आवश्यक आहे. नवीन पिढीला संस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यायला आवडत नाही. त्यामुळे त्यांचे प्रबोधन होत नाही. रूढी, परंपरा जपल्या पाहिजेत. आंतरजातीय विवाह करण्यास विरोध असण्याचे कारण नाही, पण विचार करून असे विवाह व्हायला हवेत. दोन वर्षे श्रद्धा त्याच्याबरोबर राहत होती. ती शिकलेली होती. तरीही तिला स्वत:बाबत निर्णय घेता आला नाही, हे दुर्दैव आहे.

Web Title: Be careful in Live In Sayings of literary men in Vasai; Expressed outrage over the incident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.