सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 04:53 PM2018-10-09T16:53:51+5:302018-10-09T17:01:48+5:30

प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे.

Be careful! Shop closes permanently if a plastic bag is found | सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

सावधान! प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास दुकान कायमचे बंद

googlenewsNext

मुंबई : प्लॅस्टिक बंदी केल्यानंतरही बऱ्याच दुकानांमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सर्रास होत असल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. यापुढे दुकानात प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास ते दुकान कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली आहे.


राज्यात काही महिन्यांपूर्वी प्लॅस्टिक आणि थर्माकोलच्या वापरावर बंदी आणली होती. तसेच जुना स्टॉक संपविण्यासाठी तीन महिन्यांची मुदतही दिली होती. मात्र, दुकानदारांनी मुदत संपूनही प्लॅस्टिक पिशव्यांच्या वापर सुरुच ठेवल्याने अखेर पर्यावरण खात्याने कडक पाऊल उचलले आहे. सुरुवातीला प्लॅस्टिक पिशवी सापडल्यास 5 हजारांचा दंड केला जात होता. याविरोधात दुकानदारांना तक्रारीही केल्या होत्या.


आता हा दंड घेण्यात येणार नसून थेट दुकानावरच कारवाई करण्यात येणार आहे. दुकानदारांना पुरेशी संधी दिली होती. आता एकजरी प्लॅस्टिकची पिशवी आढळल्यास थेट दुकानच कायमचे बंद करण्यात येणार असल्याची माहीती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली. यासाठी दुकानदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Be careful! Shop closes permanently if a plastic bag is found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.