‘लाइक’ आणि ‘शेअर’ करताना सावधान!

By admin | Published: June 10, 2014 02:06 AM2014-06-10T02:06:38+5:302014-06-10T02:06:38+5:30

गेल्या आठवडय़ापासून सोशल नेटवर्किग साईट्सवरील आक्षेपार्ह मजकुराने अफवा पसरवणा:यांना राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दम भरला आहे.

Be careful when 'Like' and 'Share'! | ‘लाइक’ आणि ‘शेअर’ करताना सावधान!

‘लाइक’ आणि ‘शेअर’ करताना सावधान!

Next
>कठोर कारवाई : अफवेखोरांना पाटील यांचा इशारा
मुंबई : गेल्या आठवडय़ापासून सोशल नेटवर्किग साईट्सवरील आक्षेपार्ह मजकुराने अफवा पसरवणा:यांना राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दम भरला आहे. अशा आक्षेपार्ह मजकुराला ‘लाइक’ आणि ‘शेअर’ करणा:यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले.
महनीय व्यक्तींचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर अपलोड केल्याप्रकरणी पुणो येथील आयटी व्यावसायिकाचा हिंदू राष्ट्र सेनेच्या काही कार्यकत्र्यानी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यातच रविवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आक्षेपार्ह फोटो सोशल नेटवर्क साईट्सवर अपलोड करण्यात आले आणि पुन्हा पुणो, नाशिक आणि कोल्हापूर येथे तणाव निर्माण झाला. त्याबाबत आर.आर. पाटील म्हणाले, सोशल मीडियाचा वापर सर्वत्र होत आहे. मात्र याचा चांगला उपयोग होण्याऐवजी गैरवापर होत असल्याचे अशा प्रकरणांतून दिसून येते आहे. शिवाय अशा प्रकरणांत मोबाइलचा गैरवापर होत असल्याचे म्हटले जात आहे. मात्र कोणत्याही व्यक्तीच्या मोबाइलचा गैरवापर झाला, असे अशा प्रकरणांत मान्य केले जाणार नाही. कारण स्वत:च्या मोबाइलची जबाबदारी सर्वस्वी मोबाइलधारकाची असेल.
विशेषत: सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्याची गरज भासल्यास नवीन कायदा करण्यात येईल, असेही गृहमंत्र्यांनी आवजरून सांगितले.  (प्रतिनिधी)
 

Web Title: Be careful when 'Like' and 'Share'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.