एट्रो-व्हायरसपासून सावध
By admin | Published: June 8, 2016 02:41 AM2016-06-08T02:41:27+5:302016-06-08T02:41:27+5:30
वातावरणातील ‘एट्रो’वायरस मुळे घसादुखी, ताप याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे येथील प्रतिथयश डॉ. अरुण मनोरे यांनी सांगितले.
विक्रमगड : उन्हाचा दाह,मान्सून पूर्व वातावरणांतील बदल,ढगाळ वातावरण,या मुळे आईस्क्रीम, फ्रीज मधील थंड पाणी,यांच्या अधिक सेवनात वातावरणातील ‘एट्रो’वायरस मुळे घसादुखी, ताप याच्या रुग्णांत वाढ झाल्याचे येथील प्रतिथयश डॉ. अरुण मनोरे यांनी सांगितले. सर्दी,खोकला,घसा दुखी,असे आजार केवळ थंडीत,पावसाळ्यात होतात असा समज आहे.या दोन ॠतु मध्ये अधिक काळजी घेतली जात असली तरी मान्सून पूर्व उन्हाळ्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही.त्या मुळे अधिक थंड पेये,कोल्ड ड्रिंक हट्टाने घेतले जाते.या अधिक थंड पेया मुळे एका बाजूने शरीराचे तापमान वाढत जाते. सतत तहान लागत असल्याने पुरेसे पाणी न प्याल्याने तोंडातील थुंकी घट्ट होते.ती गिळण्याची प्रक्रि या कमी झाल्याने दीर्घकाळ तोंडात टिकणाऱ्या थुंकी मुळे घसा विकाराची लागण होते.या साठी अधिक थंड पाणी न पिता नॉर्मल-साधे पाणी सेवन करणे आवश्यक आहे.बऱ्याचदा डॉक्टरांचा सल्ला न घेता परस्पर स्वत:च्या मनाने विविध औषधे घेतली जातात.त्याने योग्य निदान न होता वाढणारी अॅसिडीटीमुळे घसा दुखी सुरू होऊ शकते.त्यामुळे शक्यतो कृत्रिमरित्या थंड केलेले पदार्थ कमी करून आहारात घरगुती थंड पदार्थ अधिक घेणे उचित ठरते,असे डॉ.मनोरे याचे म्हणणे आहे.
वातावरणातील ‘एट्रो’वायरस सारखे २०० प्रकारचे व्हायरस कार्यरत असतात,हे वातावरण त्यांना पोषक असते. बॅक्टेरिया-आणि व्हायरस हे अशा तापमानात वाढीस लागतात.
>कशामुळे होतो प्रादुर्भाव
बॅक्टेरिया मुळे होणाऱ्या आजाराचे प्रमाण अधिक दिसून आले आहे. अतिउष्णतेमुळे केले जाणारे थंड पदार्थांचे सेवन हे घसा दुखीचे मोठे कारण ठरते.या मध्ये उघड्यावरील पदार्थ खाल्ले गेले की, त्यातील विषाणू,धुलीकण,बर्फामधील अशुद्ध पाणी यामुळे घसादुखी ,ताप याचे प्रमाण अधिक वाढते आहे. त्यामुळे मान्सून पूर्व काळात अधिक काळजी घेण्याची गरज आहे.