हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध होऊया : नाईक

By Admin | Published: July 13, 2017 01:03 AM2017-07-13T01:03:18+5:302017-07-13T01:03:18+5:30

हिंदू राज्य व्यवस्थांचा आदर्श इतिहास असतानाही स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेसनेत्यांनी ब्रिटिश राज्यव्यवस्थेवर आधारित लोकशाही व्यवस्था स्वीकारली

Be committed to the establishment of Hindu Nation: Naik | हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध होऊया : नाईक

हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटिबद्ध होऊया : नाईक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हिंदू राज्य व्यवस्थांचा आदर्श इतिहास असतानाही स्वातंत्र्यानंतर तत्कालीन काँग्रेसनेत्यांनी ब्रिटिश राज्यव्यवस्थेवर आधारित लोकशाही व्यवस्था स्वीकारली, परिणामी गेल्या ७० वर्षांत भारताची स्थिती दयनीय झाली आहे.
ही स्थिती पालटण्यासाठी आपल्याला लोकशाहीतील दृष्प्रवृतींचे निर्मूलन करण्यासाठी पुन्हा आदर्श राज्यव्यवस्थेची अर्थात धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्राची स्थापना करावी लागेल. यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया, असे प्रतिपादन प्रवीण नाईक यांनी केले. सनातन संस्था, धर्मसभा न्यास आणि हिंदू जनजागृती समिती आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात ते बोलत होते.
या वेळी भाजपाचे आमदार मेधा कुलकर्णी, भाजपाच्या नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

Web Title: Be committed to the establishment of Hindu Nation: Naik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.