अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे

By Admin | Published: October 17, 2016 01:03 AM2016-10-17T01:03:59+5:302016-10-17T01:03:59+5:30

उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे.

Be Expressed Without Acknowledgment | अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे

अभिनिवेश न बाळगता अभिव्यक्त व्हावे

googlenewsNext


पुणे : अलीकडच्या काळात कविता समजणे, साहित्याचे वाचन करणे, उपरेपणाचे वाटू लागले असून सध्याचा तरुणवर्ग कलाकृतींच्या माध्यमातून मोकळेपणाने बोलू लागला आहे. कोणताही अभिनिवेश न बाळगता, पळवाट न शोधता लेखकाने अभिव्यक्त झाले पाहिजे, असे मत दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी रविवारी व्यक्त केले.
श्रीरंजन आवटे लिखित ‘सिंगल मिंगल’ या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ््यात मंजुळे बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ कथाकार व नाटककार जयंत पवार, राजहंस प्रकाशनच्या विनया खरपेकर उपस्थित होते. या वेळी कादंबरीतील निवडक भागांचे अभिवाचन करण्यात आले.
मंजुळे म्हणाले, ‘‘साहित्य कलाकृतीतून आरसा दाखविण्याचा प्रयत्न होतो. मात्र, अनेकांना त्यातून चेहऱ्यावरची घाण दिसत असते. त्यामुळे आरसा तोडण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, हा आरसा टिकवण्यावर भर द्यायला हवा. माणसांना एकाकीपणाने ग्रासले असून हे थांबविता येणार नाही. चांगल्या अभिव्यक्तीतून माणूसपण चांगल्या पद्धतीने सांगता येते. क्रांतीच्या आणि दगडफेकीच्या काळात कविता सुचणे ही चांगली गोष्ट आहे. तसेच काही माणसांना आपल्याला नेमके काय हवे आहे, हे सांगता येत नाही. परंतु, अशाच गोष्टी श्रीरंजन आवटे यांनी कादंबरीच्या माध्यमातून सांगितल्या आहेत.’’ आपल्याला काय हवे आहे, आपली मागणी काय आहे, हेच माहित नाही तरी आपण गडबड करतो. इतरांवर राग काढतो, असे सूचक वक्तव्य मंजुळे यांनी केले. श्रीरंजन आवटे यांनी कादंबरी लेखनामागची भूमिका सांगितली. विनया खरपेकर यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)
>साहित्य हा समाजाचा आरसा दाखवत असतो. तेच या कादंबरीतून दिसते. ‘सिंगल मिंगल’मध्ये तरुण पिढीच्या मनात सुरू असलेले कलह चित्रित केले आहेत. कादंबरीमधील पात्र पूर्वीच्या रिलेशनशिपच्या आठवणी विसरत नवनवीन रिलेशनशिप शोधत आहेत. ही भारतीय मानसिकता आहे. जागतिकीकरणानंतरच्या तरुण पिढीचे प्रतिबिंब या कादंबरीत दिसून येते.- जयंत पवार

Web Title: Be Expressed Without Acknowledgment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.