स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, उद्धव ठाकरेंचा कार्यकर्त्यांना सल्ला
By admin | Published: June 19, 2016 07:45 PM2016-06-19T19:45:37+5:302016-06-19T21:42:04+5:30
स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा, असा सल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. युती तोडण्याची आमची इच्छा नाही. लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात आणि लाटेत ओंडकेही तरंगत असल्याची घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी मित्र पक्ष भाजपवर केली आहे. शिवसेनेच्या स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत असल्यानं गोरेगाव येथील एनएससी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेनं आतापर्यंत लाखो शिवसैनिक जोडले आहेत. सेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. मात्र ते यशस्वी होऊ शकले नाहीत, अस म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
शिवसेनेच्या मातीत जन्म झाला हे भाग्य
मेळाव्याला येताना पाऊस आला. भिजवून टाकलं हे शुभचिन्ह
आज महाराष्ट्र भगव्या रंगाने न्हाऊन निघालाय
ज्या मातीत शिवराय, बाळासाहेब जन्मले, तिथे जन्मलो, हे भाग्य
आपलेच विरोधक आपल्या अंगावर आले आहेत
शिवरायांचा इतिहास ऐकून नुसतं थंड बसायचं का ?
बाहेरच्या विरोधकांपेक्षा, आपलेच जास्त विरोधक झालेत
शिवसेनेनं गुंडगिरी केली असती तर सेना 50 वर्षं टिकली नसती
माझ कौतुक केलं जातं, ६३ आमदार आणले, मी शून्य आहे,
मी फक्त तुम्हाला ताकदीची जाणीव करून दिली, हे तुमच यश !
आणीबाणीत 'मार्मिक'च्या छापखान्याला टाळं लागलं होतं, आणीबाणीचा सेनेलाही फटका
बंगालच्या लोकांनी दिल्लीश्वरांना नमवलं
बाळासाहेबांनी सांगितलं, तेच ममता बॅनर्जींनी सांगितलं,
"मां, माटी, मानूष!" बंगालीबाबूंना धन्यवाद, दिल्लीश्वरांना पराभूत केलंत
विधानसभेच्या वेळी थोडा वेळ मिळाला असता तर चित्र उलटवून दाखवलं असतं
शिवसेनेने अनेक लाटा झेलल्या आहेत
शिवसेना संपवणारे फक्त लाटेतच फडफडतात
संकटाच्या काळात धावून शिवसेनेचा वाघच येतो
मुंबई आणि मुंबईतले हिंदू शिवसेनेने वाचवले
मुंबई पेटली तेव्हा धावून आला तो शिवसैनिकच
आम्ही सत्तेसाठी कधी लाचार झालो नाही,
सत्तेसाठी वेडीवाकडी तडजोड केली नाही
शिवसेनेची भविष्यात एकहाती सत्ता आणून दाखवेन
काश्मिरी पंडितांना न्याय का मिळत नाही?
शिवसेनाप्रमुखांनी मुंबईत राहून काश्मिरी पंडितांना तेव्हा आधार दिला
राम मंदिर, समान नागरी कायदा या घोषणांचं काय झालं ?
कुठे गेले होते राष्ट्रीय पक्ष जेव्हा शिवसेनाप्रमुख काश्मीर पंडितच्या सोबत उभे होते
आम्ही सत्तेमागे कधीच धावलो नाही
उत्तर प्रदेशमधल्या कैरोनामध्ये भाजपला हिंदूंचं स्थलांतर का रोखता येत नाही
हिंदुत्वाची मतं फुटू नये, या वेड्या आशेपायी आम्ही इतर राज्यात लढलो नाही
सिंह मागे वळून पाहतो, मात्र वाघ मागे वळून पाहत नाही
राज्यातही तेच झालं, पण आता फेरविचार केला पाहिजे
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तर मग अपक्षाच्या प्रचारालाही गेलं पाहिजे
एकाच वेळी निवडणुका घेतल्यास परदेश दौऱ्यावरून यावे लागणार नाही
निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाऊ नये
पवारसाहेब, आमचं आणि भाजपचं आम्ही बघून घेऊ
महागाई नियंत्रणात आणा, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
देश बदलला ही भाजपची घोषणा फसवी.
महागाई, सीमेवरील सुरक्षेत काहीच बदल झाला नाही
अनेक पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, नेते झाले पण हिंदुहृदयसम्राट एकच
'देश बदल रहा है', पण परिस्थिती बदलली नाही
देशातली परिस्थिती अजूनही तशीच आहे देश बदलेला नाहीये
अच्छे दिन माहीत नाही, पण किमान समाधानाचे दिवस तरी आणा
युती करायची की नाही ते मी ठरवेन.
आपल्याला आपल्या ताकदीवर निवडणुका जिंकण्याची तयारी ठेवावीच लागेल
आगामी महापालिका निवडणुकीत युती होणार की नाही माहीत नाही
आम्हाला युती तोडायची अजिबात इच्छा नव्हती
युती केल्यास स्वाभिमानाने करू, लाचार होऊन तुमच्या मागे धावणार नाही
दिवाकर रावते आणीबाणीत हातगाडीवरून मार्मिक घेऊन जात होते
शिवसेनेनं आतापर्यंत लाखो शिवसैनिक जोडले
सेना संपवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले
लाटेत ओंडके तरंगतात
लाट निघून गेल्यानंतर गोटेही उघडे पडतात
आमची रिजनल पार्टी असली तर ओरिजनल आहे
शिवसेनेची एकहाती सत्ता मी उद्या आणून दाखवेन
स्वतःला सिंह म्हणवून घेणारे 93च्या दंगलीत कुठे होते ?
टीका करत नाही जे सत्य आहे ते बोलतो
वाघ कधीच मागे वळून बघत नाही, तो पुढेच चालतो
सिंह कळपात फिरतो, वाघ एकटाच असतो
युतीचं काय होणार हे माहीत नाही
वेडीवाकडी युती करणार नाही
सत्तेसाठी लाचारी पत्करणार नाही
युती केल्यास स्वाभिमानानं करू
युती तोडण्याची आमची इच्छा नाही
स्वबळावर निवडणुका लढण्यास तयार राहा