संघर्षासाठी तयार राहा!
By admin | Published: June 6, 2014 01:14 AM2014-06-06T01:14:33+5:302014-06-06T11:36:51+5:30
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे.
Next
>पराभूत उमेदवारांना सोनिया गांधींचे पत्र
शीलेश शर्मा - नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले पक्षनेते व सर्व उमेदवारांना पत्र पाठविले असून पक्षासाठी सध्या कठीण काळ असल्याचा उल्लेख केला आहे. या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपापल्या मतदारसंघात कठोर परिश्रम घ्या. लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला आहे.
काँग्रेसचे पराभूत नेते व उमेदवारांशी चर्चा करण्याचीही योजना त्यांनी आखली असून त्याचे संकेत पत्रत दिले आहेत. मी, या संघर्षात तुमच्या सोबत असेल असेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी पक्षाच्या मानहानीकारक पराभवातून अद्यापही सावरलेल्या नाहीत. पक्षाची घडी नीट बसविण्याची चिंता सतावत असतानाच त्यांनी काँग्रेसच्या सर्व पराभूत उमेदवारांना हे भावनिक पत्र पाठविले आहे.
राहुल गांधी यांची कमकुवत राजकीय रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार आहेत. घाईगडबडीत कोणतेही प्यादे पुढे करत नंतर कमकुवतपणा सिद्ध होऊ नये यासाठी त्या खबरदारी घेत आहेत. मोदी सरकारविरुद्ध लगेच आक्रमक धोरण अवलंबण्याची त्यांना घाई नाही. त्यांना प्रथम पक्षाची घडी व्यवस्थित बसवायची आहे. त्यानंतरच त्या मोदी सरकारविरुद्ध आघाडी उघडण्याच्या मन:स्थितीत आहेत. मोदी सरकार स्वत:ची प्रतिमा चांगली दाखविण्यासाठी खूपच घाई करत असून ‘अच्छे दिन आले वाले’च्या आश्वासनांबाबत लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात, असे सोनिया गांधी यांना वाटते.
राहुल गांधींबद्दल असलेली नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी लिहिलेले हे पत्र भावनिक असून त्याचा पराभूत उमेदवारांवर थेट प्रभाव पडू शकतो.
16 व्या लोकसभेतील पराभवामुळे सभागृहात मला आपली उणीव जाणवत आहे. आपण पूर्ण शक्तिनिशी निवडणूक लढायला हवी होती. आता या धक्क्यातून सावरण्याची आणि संघर्षासाठी तयार राहण्याची वेळ आली आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
च्रणनीती सुधारण्यासह पुढील पावले टाकण्याला त्या अग्रक्रम देणार
च्लोकांचा भ्रमनिरास होणो सुरू होईल. तेव्हा सरकारच्या चुका लोकांसमोर मांडाव्यात.
च्लोकांचा पुन्हा विश्वास जिंका. त्यासाठी संघर्ष करा, पण हिंमत हरू नका, असा धीर त्यांनी दिला.
विरोधाचा सूर
च्काँग्रेसमध्ये राहुल गांधींविरुद्ध विरोधाचा सूर वाढत आहे. केरळ, राजस्थान, हरियाणा आणि आसाममध्ये असंतोष वाढत असल्याची माहिती सोनिया गांधींना मिळाली आहे. राहुल गांधी आणि त्यांच्या टीममुळेच काँग्रेसचा पराभव झाल्याचे मानले जाते.
च्मानहानीकारक पराभवानंतरही राहुल गांधी यांच्या कार्यशैलीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. मधुसुदन मिस्त्री हे अजूनही ज्येष्ठ नेत्यांना कनिष्ठपणाची वागणूक देत असून त्याबाबत सोनिया गांधींकडे तक्रार आली आहे. त्यांनी या कार्यपद्धतीवर नियंत्रण आणण्याची तयारी सुरू केली आहे. त्या पूर्वीप्रमाणोच पक्षनेत्यांशी थेट संवाद साधत राहतील, असे सूत्रंनी सांगितले.