स्मार्ट व्हा, स्मार्ट शिका...

By admin | Published: June 20, 2017 05:44 AM2017-06-20T05:44:44+5:302017-06-20T05:44:44+5:30

दहावीनंतर अकरावी आणि बारावी हेच पर्याय नसून, वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी मिळवून देणारे डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आज वेगवेगळ्या संस्थांतर्फे चालवले जातात

Be smart, learn smart ... | स्मार्ट व्हा, स्मार्ट शिका...

स्मार्ट व्हा, स्मार्ट शिका...

Next

दहावीनंतर अकरावी आणि बारावी हेच पर्याय नसून, वेगवेगळ्या क्षेत्रातील कौशल्य विकासाच्या संधी मिळवून देणारे डिप्लोमा, सर्टिफिकेट कोर्सेस आज वेगवेगळ्या संस्थांतर्फे चालवले जातात. डिप्लोमा कोर्सेसची निवड स्मार्ट असू शकते. कारण लहान वयात तुम्हाला करिअर निवडण्याची संधी मिळते आणि इतर शाखांमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा तुम्ही लवकर आपल्या पायावर उभे राहू शकता.

विनामूल्य शिक्षण आणि नोकरीची हमी देणारे आज खूप कोर्सेस आहेत, पण त्यापैकी किती कोर्सेस तुम्हाला खऱ्या अर्थाने कौशल्यनिपुण आणि सक्षम बनवतात? किती कोर्सेस तुम्हाला निवडलेल्या कौशल्य क्षेत्रात पुढील शिक्षणाच्या संधी मिळवून देतात? आजच्या धकाधकीच्या जीवनात टिकाव लागण्यासाठी विद्यार्थ्यांनी योग्य करिअर निवडणे ही खूप मोठी कसरत असते. लोभस आश्वासने देऊन विद्यार्थी आणि पालकांचा अपेक्षाभंग झाल्याची खूप उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी जॉब ओरिएंटेड कोर्सेसच्या अ‍ॅडमिशनसाठी जाण्याअगोदर काही गोष्टींची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे.
कोर्सेससाठी लागणारी क्षमता
ही केवळ मार्कांवर अवलंबून नसते, तर त्यासाठी लागणारी अ‍ॅपटिट्यूट व त्यानुसार मेहनत करण्याची तयारी आहे की नाही, हे पडताळून पाहणे खूप महत्त्वाचे आहे.
शिकवले जाणारे अभ्यासक्रम
हा खूप महत्त्वाचा असतो, जर अभ्यासक्रम काळाप्रमाणे बदल न करता, तोच असेल, तर विद्यार्थ्यांचे नुकसान होते. कारण त्याच्या बळावर तुम्हाला पुढील नोकरी व शिक्षणाच्या संधी प्राप्त होत असतात.
नोकरी व रोजगाराच्या संधी
अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर नोकरी व रोजगाराच्या संधी आहेत की नाहीत आणि त्यासाठी लागणारी मदत संस्था करते की नाही, हे तपासून घेणे गरजेचे असते.
कोर्स पूर्ण झाल्यावर पुढील शिक्षणाच्या संधी नसतील, तर पुढील प्रगती थांबू शकते, तुम्ही नोकरी मिळवाल, पण आयुष्यात जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पुढे जायचे असेल, तर या स्तरावर उच्चशिक्षण मोलाचे ठरू शकते. आपण निवड करत असलेली संस्था मान्यताप्राप्त आहे आणि असेल, तर तेथून पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पडताळून बघणे आणि त्यांना आलेले अनुभव समजून घेणे आवश्यक असते.
- डॉ. सचिन लड्ढा
प्राचार्य, पी.व्ही.पॉलिटेक्निक


अशा डिप्लोमा कोर्सेसचे काही पर्याय खालीलप्रमाणे
१. डिप्लोमा इन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन अँड सर्व्हिसेस (अनुदानित)
पात्रता :- एस. एस. सी.
कालावधी :- ३ वर्षे
विद्यार्थिनींना अकाउंटिंग, इंग्रजी संभाषण कुशलता, कॉम्प्युटर, टायपिंग, शॉर्टहँड, फाइलिंग, ट्रॅव्हल अरेंजमेंट, इकॉनॉमिक्स, कॉमर्स इत्यादी विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्या आॅफिस असिस्टंट, ज्युनिअर एक्सिक्युटिव्ह, सेल्स/मार्केटिंग कॉआॅर्डीनेटर, सेक्रेटरी, रिसेप्शनिस्ट इत्यादी विविध प्रकारची कामे करू शकतात. डिप्लोमानंतर बी.ए/ बी.कॉम / बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
२. डिप्लोमा इन अपेरल मॅनुफ्रॅक्चर अँड डिझाइन (अनुदानित)
पात्रता :- एस.एस.सी.
कालावधी :- ३ वर्षे
विद्यार्थिनींना मुख्यत्वे करून टेक्सटाइल आणि फॅशन क्षेत्रात प्रशिक्षण दिले जाते. पॅटर्न मेकिंग, अपेरल कन्स्ट्रक्शन, फॅशन आर्ट आणि इलुस्ट्रेशन
या विषयांवर विशेष भर दिला जातो. प्रशिक्षण पूर्ण
झाल्यावर विद्यार्थिनी फॅशन डिझायनर, स्टायलिस्ट इ. कामे करू शकतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला
प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
३. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स (अनुदानित)
पात्रता :- एस. एस. सी.
कालावधी :- ४ वर्ष
यात चार वर्षांमध्ये १ वर्षांचे इंडस्ट्रियल ट्रेनिंग दिले जाते, तसेच एफ.पी.जी. ए./सी.पी.एल.डी. व १६/३२ बिट मायक्रोकंट्रोलर प्रोग्रामिंगसारख्या नवीनतम तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. तंत्रज्ञान आत्मसात करणे सोपे जावे, म्हणून सुरुवातीपासून आॅर्डिनो व रासबेरीपायी यासारख्या इलेक्ट्रॉनिक अ‍ॅप सुलभ करणारे प्लॅटफॉर्मही वापरले जातात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
४. डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी (अनुदानित)
पात्रता :- एस. एस. सी.
कालावधी :- ३ वर्ष
विद्यार्थिनींना अन्न प्रक्रिया व संलग्न विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. अन्न चाचण्या व सेंसॉर इव्हॅल्यूएशन हे विषय हे या कोर्सचे खास वैशिष्ट्य आहे. २००४ मध्ये या विभागाला मिनिस्ट्री आॅफ फूड प्रोसेसिंगकडून ४५ लाख ६६ हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. प्रशिक्षित विद्यार्थिनी अन्नसंबंधित विविध क्षेत्रात नोकरी करू शकतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
५. डिप्लोमा इन इंटिरियर डिझाइन (अनुदानित)
पात्रता :- एस. एस. सी .
कालावधी :- साडेतीन वर्ष
विद्यार्थिनींना इंटिरियर डिझाइन आणि आर्किटेच्युरल स्पेसेसबद्दल प्रशिक्षण दिले
जाते. ते पूर्ण झाल्यावर इंटिरियर डिझायनर, फर्निचर डिझायनर म्हणून काम करू
शकतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.

६. डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी (अनुदानित)
पात्रता - एस.एस.सी.
कालावधी - ३ वर्ष
वैद्यकीय तंत्रज्ञास वैद्यकीय नमुने योग्य प्रकारे गोळा करण्याचे काळजीपूर्वक प्रयोगशाळेत प्रक्रियेसाठी पोचविण्याचे व त्याची चाचणी करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. या विद्यार्थिनी पुढे पॅथॉलॉजी लॅबमध्ये व रक्तपेढ्यांमध्ये नोकरी करू शकतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
७. डिप्लोमा इन आॅफथेलामिक टेक्नॉलॉजी (अनुदानित)
पात्रता :- एस.एस.सी.
कालावधी :- ३ वर्ष
विद्यार्थिनींना रिफ्रॅक्शन स्किल, कॉन्टॅक्ट लेन्सेस, व्हिजन एडस, आॅर्थोप्टिक्स या विविध विषयांचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, त्या आय सर्जरी व विविध नेत्र चिकित्सांमध्ये मदत करू शकतात. त्या हॉस्पिटल व दवाखान्यात आॅप्टोमेट्रिस्ट म्हणून काम करू शकतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला संधी उपलब्ध आहेत.
८. डिप्लोमा इन फार्मसी (अनुदानित)
पात्रता :- एच.एस. सी.
कालावधी :- २ १/२ वर्ष
विद्यार्थिनींनी औषध निर्माण शास्त्राबद्दल प्रशिक्षण दिले जाते व यानुसार विद्यार्थिनी रजिस्टर्ड फार्मासिस्ट (स्टेट फार्मसी कौन्सिल) बनतात. डिप्लोमानंतर पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेण्याच्या संधी उपलब्ध आहेत.
९. डिप्लोमा इन ट्रॅव्हल अँड टुरिझम (विना-अनुदानित)
पात्रता :- एस. एस. सी.
कालावधी :- ३ वर्ष
या विद्यार्थिनींना पर्यटन क्षेत्रातील विविध विषयांचे प्रशिक्षण दिले
जाते. कम्प्यूटर रिझर्व्हेशन सीस्टिम अ‍ॅबकस या विषयांचे खास
प्रशिक्षण दिले जाते. हा डिप्लोमा
पूर्ण झाल्यावर विद्यार्थिनींना पर्यटन क्षेत्रात नोकरीच्या विविध संधी उपलब्ध आहेत. उदा. एअर लाइन्स , ट्रॅव्हल एजेन्सी, हॉटेल इ. डिप्लोमानंतर ‘आयटा’ पुरस्कृत कोर्सेससाठी उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत.

Web Title: Be smart, learn smart ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.